Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

भूजल पुर्नभरणासाठी काय करता येईल..?

    पृथ्वीचे ‘बहुरत्ना वसुंधरा’ असे वर्णन केले जाते. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या रत्नांपैकी पाणी हे एक महत्वाचे संसाधन आहे. पाणी हे एक महत्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. या पृथ्वीतालावरील सर्व सजीव सृष्टीची निर्मिती ही पाण्यामाधुनच झाली आहे. सर्व सजीवांच्या जीवनाचा आधार पाणी आहे. मानवाचा इतिहास पहिला तर ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे त्या ठिकाणी मानव स्थिरावला आणि त्याचा विकासही तेथेच झाला. मेसोपोटेमिया, इजिप्त, हडप्पा यांसारख्या विविध प्राचीन संस्कृतींचा विकास हा नद्यांच्या किनाऱ्यावर झालेला आढळतो. त्यामुळे उपलब्ध असलेल्या पाण्याच्या काळजीपूर्वक वापर करणे अत्यंत गरजेचे आहे आणि पाण्याचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.प्रमाणापेक्षा उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याने भविष्यात पाण्याचे संकट उभे ठाकण्याची शक्यता नाकारता येणार नाही.या पार्श्वभूमीवर पाण्याचे पुनर्भरण व जलस्रोत वाढविणे आवश्यक आहे.

    देशातील ६९६५ भूजल स्रोतांपैकी तब्बल एक हजार ११४ स्रोत आति शोषित असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील २०७ स्रोतांपैकी११ स्रोत गँभिर आहेत.केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने व केंद्रित भूजल मंत्रालयाकडून भारतीय नदी पात्रातील भूजल स्रोतांबाबतचा २०२२ अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. भूजल संवर्धन, भूजल पुर्नभरणाची देशातील नेमकी स्थिती,त्या संदर्भात राबवायच्या उपाययोजना या दृष्टीने हा अहवाल महत्वाचा आहे.

    महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ८० टक्के पिण्यासाठीचा पाणीपुरवठा हा भूजलाद्वारे भागविला जातो; तसेच ५० टक्के सिंचन क्षेत्रही भूजलसाठ्यावरच अवलंबून आहे. जमिनीवरील पाण्याचा साठा व भूजलसाठा हे पाण्याचे दोन्ही साठे प्रामुख्याने पावसावरच अवलंबून आहेत. पाऊसमान चांगले असल्यास जमिनीवरील पाणीसाठे उदा. धरणे, शेततळी, तलाव इत्यादी; तसेच पाणी जिरल्यामुळे भूजलसाठ्यातही काहीशी वाढ होते. लोकसंख्यावाढ, शहरीकरण, औद्योगीकरण, जमीन व पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, मृद व जलसंधारण उपायांकडे दुर्लक्ष, पाणी वापरासंबंधी साक्षरतेचा अभाव, जास्त पाणी लागणाऱ्या पिकांखालील क्षेत्रात होत असलेली वाढ, भूजल पुनर्भरणासाठीचे अपुरे प्रयत्न, नैसर्गिकरीत्याही भूजल पुनर्भरण कमी होणे, दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलाची वाढलेली मागणी या व अशा कारणांमुळे भूजलपातळी खोल खोल गेलेली आहे. ज्या प्रमाणात भूजलाचा उपसा करण्यात येत आहे, त्याप्रमाणात भूजलाचे पुनर्भरण होत नाही, त्यामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल गेलेली आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे शक्‍य आहे, त्या ठिकाणी जिरविण्याचे प्रयत्न करणे आवश्‍यक तर आहेच, सोबतच उपलब्ध असलेल्या भूजलाचा काटकसरीने व शास्त्रीय पद्धतीने वापर करणेसुद्धा गरजेचे आहे.

    भूजल पातळी वाढवण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम गतिमानपणे राबविण्यास प्राथमिकता दिल्यास भविष्यात पाणीटंचाईवर मात करणे शक्‍य आहे. पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत जमिनीचा चढ-उतार, मातीचा प्रकार, पावसाचे प्रमाण, पाणलोटातून वाहणारे नाले या सर्व बाबी विचारात घेऊन कृषी अभियांत्रिकी उपाय राबवावेत.

    पाणलोट क्षेत्रामध्ये सलग समतल चर, दगडी बंधारे, सिमेंट नाला बांध, मातीनाला बांध, शेततळे, ढाळीचे बांध, शेताची बांधबंदिस्ती हे सर्व उपाय राबवून भूजलपातळीत वाढ निश्‍चितच होते. सोबतच भूजलाचा शास्त्रीय पद्धतीने सिंचनासाठी वापर करणे गरजेचे आहे. पारंपरिक सिंचन पद्धती, वाफे पद्धत, सरी-वरंबा पद्धत, सारे पद्धत इत्यादींमध्ये पाण्याचा भरपूर अपव्यय होतो. हे टाळण्यासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचन या पद्धतींचा पीक घेण्यासाठी वापर करून पाण्याची बचत करता येईल.

    भूजल पुनर्भरण करण्यासाठी विहिरी व कूपनलिकांचा वापर करता येतो. पावसाच्या पाण्याचे विहिरीद्वारे भूजल पुनर्भरण करण्यासाठी अथवा छताच्या पाण्याचे कूपनलिकेमध्ये भूजल पुनर्भरण करण्यासाठी प्रथम शेतातील पाणी अथवा छतावरील पाणी एकत्रित करणे गरजेचे आहे. ज्या पाण्याचे पुनर्भरण आपण करणार आहोत त्या पाण्याची प्रत चांगली असणे आवश्‍यक आहे. हे पाणी योग्य गाळण यंत्रणेच्या मार्फतच पुनर्भरणाच्या ठिकाणी पोचले पाहिजे. तसेच, यामध्ये सर्वांत महत्त्वाची व आवश्‍यक गोष्ट म्हणजे याकरिता योग्य ठिकाणी गाळ स्थिरीकरण टाकीची मांडणी करणे गरजेचे आहे.

    विहीर व कूपनलिकांद्वारे भूजल पुनर्भरण करताना गाळण यंत्रणा कार्यक्षमपणे काम करणारी असावी. गाळण यंत्रणेतून पाण्यासोबत गाळ जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात घराच्या छतावर पडणारे पाणी पाइपचा उपयोग करून एकत्रितरीत्या जमा करून शोषखड्ड्यात अथवा कूपनलिकेत सोडल्यास भूजल पुनर्भरण करणे शक्‍य आहे. पहिल्या एक- दोन पावसाच्या पाण्याचा उपयोग पुनर्भरणासाठी करण्यात येऊ नये.

    भविष्यकाळात पावसाच्या पाण्याचे व छतावरील पाण्याचे पुनर्भरण करणे अत्यंत गरजेचे आहे. दुष्काळाची भीषण परिस्थिती टाळण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्भरण करणे म्हणजेच भविष्यातील पाणीसाठे निर्माण करणे होय.

    -प्रा डॉ सुधीर अग्रवाल
    (Images Credit : Krushi Jagat)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code