Recent in Technology

Advertisement

Breaking News

परिवर्तन....

    कोमेजलेली फुले आता फुलू लागली
    बंद हृदयाची दारे आता खुलू लागली
    काळोखाची रात्र आता सरू लागली
    नवयुगाची आता पहाट उजळू लागली
    मनामनात उत्कर्षाची जिद्द जागू लागली
    क्षणाक्षणात कुर्बानी श्रमाची मागू लागली
    सानथोर इतिहास पुर्वजांचा सांगू लागली
    हरितक्रांती येथे जेमतेम आता रांगू लागली
    गतकालीन मुकी पाखरे बोलू लागली
    कालांतराने मुक्तिगीते गाऊ लागली
    युगायुगाची बंदिस्त पाखरे उडू लागली
    नभात आता भ्रमरांची गर्दी वाढू लागली
    वतनदारीवर आपला हक्क सांगू लागली
    मक्तेदारीही आता हळुवार पेंगू लागली
    सूर्यप्रकाशाने लेकरे आता जागू लागली
    चैत्यभूमी नि दीक्षाभूमीला जाऊ लागली
    शाळेत जाऊन आता खुप शिकू लागली
    रस्त्यावरची गर्दी बाबा मात्र पांगू लागली
    धम्माचरणासाठी विहारी जाऊ लागली
    त्रिशरण,पंचशील, वंदना गाऊ लागली
    पाई चालणारी मुले आता धाऊ लागली
    आचार,विचारातून परिवर्तन दाऊ लागली
    -अरुण विघ्ने

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code