Header Ads Widget

आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे २९ गावातील रस्ते चकाकणार !

    वरुड प्रतिनिधी : मोर्शी विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार सतत प्रयत्नशील असून त्यांनी ग्रामीण भागातील रस्ते विकास करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून घेतलेला आहे.ग्रामीण भागामध्ये गावातील रस्त्यांसह अन्य सुविधांसाठी ग्राम पंचायतींकडे पुरेसा निधी नसतो हीच बाब लक्षात घेऊन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून वरुड तालुक्यातील २९ गावातील सिमेंट रस्त्यांसाठी ३ कोटी ४० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्ते चकाकणार आहे.

    वरुड तालुक्यामध्ये २९ गावातील सिमेंट काँक्रिट रस्ते निर्माण करण्यासाठी ३ कोटी ४० लक्ष रुपये निधी मंजूर केला असून वरुड तालुक्यातील रस्त्याच्या कामांना सुरुवात झाली असून लवकरच कामे पूर्ण होणार असल्याची असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी दिली.मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या पाठपुराव्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील सिमेंट रस्ता पेव्हर ब्लॉक विकासकामांना चालना देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी ३ कोटींचा ४० लक्ष रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन वरुड तालुक्यातील २९ गावातील विकसकामांकरिता ३ कोटी ४० लाख रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे.

    वरुड तालुक्यातील अनेक विकासकामे पूर्ण करण्याकरिता आमदार देवेंद्र भुयार यांचा पाठपुरावा सुरू आहे. वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी कंबर कसली असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बेनोडा, पुसला, जरूड, राजुरा बाजार, लोणी या गावातील सिमेंट काँक्रिट रोडच्या बांधकामासाठी प्रत्येकी २० लक्ष रुपये, जामगाव, तिवसाघाट, टेंभुरखेडा, गव्हाणकुंड, सातनूर, मालखेड, धनोडी, लिंगा, गणेशपूर, सावंगी, सुरळी, वाठोडा, एकदरा, पोरगव्हान, आमनेर, पवनी, वाडेगाव, गाडेगाव, आलोडा, नांदगाव, हातुर्णा, मंगरुळी, पेठ, करजगाव या गावांकरिता रोजगार हमी योजने अंतर्गत रोजगार हमी व फलसंवर्धन मंत्री संदिपान भुमरे यांनी वरुड तालुक्यातील २९ गावातील सिमेंट रस्ते व इतर महत्त्वाच्या विकासकामांसाठी ३ कोटी ४० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल आमदार देवेंद्र भुयार यांनी रोजगार हमी व फलसंवर्धन मंत्री संदिपान भुमरे यांचे आभार मानले.

    मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला होता. वरुड तालुक्यातील या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ४० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आमदार देवेंद्र भुयात यांनी वरुड तालुक्यातील रस्ते विकासाकरिता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वरुड नागरीकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या