Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

बेरोजगारीवर मात करण्यासाठी तरूणांनी साकारला वुई मॉल

    * पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख व आयआरएस अधिकारी डॉ. प्रशांत रोकडे यांनी केले कौतुक

    अमरावती (प्रतिनिधी) : वाढती बेरोजगारी, रोजगाराची वाणवा, कोरोनाने अनेकांचे हिरावलेले रोजगार, जगण्याचे निर्माण झालेले प्रश्‍न, अशा अनेक समस्यांच्या विळ्ख्यात सापडलेल्या काही भन्‍नाट कल्पनेच्या तरूणांनी स्वतःचाच व्यवसाय उभा करण्याचा प्रण करून चार महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर भव्यदिव्य मॉल अमरावती शहरातील शेगाव नाका चौकात साकारून आपल्या बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविला. सदर मॉलचे नाव वुई मॉल असून हा मॉल शहरातील नागरिकांच्या आकर्षनाचे केंद्र बनला आहे. अनेक जण या मॉलला भेट देत असून परवडेल अशा दरात दजर्र्दार कपडे मिळत असल्यामुळे मोठ्याप्रमाणात खरेदी करीत आहेत. नुकतेच या मॉलचे उद्घाटन पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख व आयआरएस अधिकारी डॉ. प्रशांत रोकडे यांनी करून मराठी तरूणांनी सामूहिकपणे उभारलेल्या या उद्योगाचे चांगलेच कौतुक केले आहे.

    गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने सर्वांनाच जेरीस आणले. या काळात अनेक जण बेरोजगार झाले. काहींचे उत्पन्‍न बुडाले. कर्जदार बँकाच्या तावडीत फसले. एकंदरितच कोरोनाने सर्वांना जेरिस आणले. जिकडेतिकडे असे भयंकर चित्र असतानाच या परिस्थितीतून उभे राहण्यासाठी काही ध्येयवादी तरूणांनी एकत्र येत व्यवसाय करण्याची कल्पना केली. त्यासाठी बैठका घेतल्या. बैठकांमध्ये अनेकांनी वेगवेगळ्ी मतांतरे व्यक्‍त केल्यानंतर कपड्यांचा मॉल सुरू करण्याला सर्वांनी हिरवी झेंडी दिली. मात्र मॉल टाकण्यासाठी एवढा पैसा आणायचा कुठून हा खरा प्रश्‍न होता. परंतु ध्येयाने झपाटलेल्या या तरूणांची समाजजिवनात चांगली व्यक्‍ती म्हणून ओळख असल्याने या तरूणांना अनेकांनी आपला शेअर म्हणून आपल्याआपल्या पध्दतीने मदत केली. सदर तरूणांनी रात्रंदिवस कलरपासून तर इलेक्ट्रिक फिटींगचेे काम करीत वुई मॉल उदयास आणला.

    नुकतेच वुई मॉलचे गुढीपाडव्याला पालकमंत्री यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, तरूणांचे आयकॉन आयआरएस अधिकारी डॉ. प्रशांत रोकडे यांनी उद्घाटन केले. यावेळी त्यांनी मराठी तरूणांच्या कष्टाची, मेहनतीची व स्वप्नांची चांगलीच प्रशंसा केली. पालकमंत्र्यांनी तर तरूणांच्या स्वप्नांना उभारी मिळण्यासाठी या मॉलमध्ये आपण वारंवार खरेदीला येणार असल्याचे सांगितले. तर माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी तरूंणाच्या या कार्याला पाठिंबा दर्शविला. आयआरएस अधिकारी डॉ. प्रशांत रोकडे यांनी अमरावतीच्या तरूणांची जिद्द, चिकाटी आणि व्यवसायात उडी घेऊन रोजगाराचा प्रश्‍न सोडविल्याच्या भूमिकेचे कौतुक केले. तसेच या मॉलला अनेकांनी भेट देऊन तरूणांचे हे कौशल्य समाजाने पाहण्याचे आवाहन केले.

    गेल्या दोन दिवसांपासून या मॉलमध्ये मोठ्याप्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. विशेष म्हणजे दर्जदार वस्तू परवडणार्‍या किंमतीत मिळत असल्यामुळे सदर मॉल नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code