नाते....
कालच झाली माझी दुःखाशी सलगी.....
आज ते आले वाजवत सुखाची त्यांच्या हलगी......!!१!!.
त्यांच्या अश्रूंना मोत्याचा भाव आहे.....
आमच्या अश्रुधारा ना पुरात वाहण्याचा सराव आहे.....!!२!!
हासणे लाघवी,मृदू हळुवार त्यांचे......
आमच्या खळाळत्या हसण्याला दुःखाची किनार आहे.......!!३!!
आपापल्या सुखांची करार केले त्यांनी.....
मी बोचताच माझी,केली शिकार त्यांनी......!!४!!
सांभाळले मी ओझे खोट्या नात्याचे,जीवनभर....
तिकडे नव्हता जिव्हाळा, माझ्यासाठी कणभर....!!५!!
जीवना असा कसा रे तू निर्दयी......
पोटासाठी इथे अब्रू सह गर्भाला विकते आई.....!!६!!
0 टिप्पण्या