Recent in Technology

Advertisement

Breaking News

अनधिकृत जाहिराती, पोस्‍टर, बॅनर्स, झेंडे, पताके लावल्‍यास महानगरपालिकेतर्फे कार्यवाही होणार

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती शहरात लावण्यात आलेल्या फ्लेक्स, बॅनर, होर्डिंगवर मुद्रक व प्रकाशकाचे नाव टाकणे अनिवार्य आहे. तसेच बॅनर लावताना बाजार व परवाना विभाग, महानगरपालिका यांची परवानगी घेणे अनिवार्य आहे. अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग असल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे निर्देश महापालिका प्रशासक डॉ.प्रवीण आष्‍टीकर यांनी दिले आहेत.

    अनधिकृत बॅनरबाजीला आळा घालण्यासाठी धडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. होर्डिंगची स्टॅबलीटी तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जे होर्डिंग अनधिकृत ठरत असेल ते काढण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. बाजार व परवाना विभागाच्या होर्डिंगबाबतच्या अटी जो पूर्ण करेल त्यांना होर्डिंग नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे. बाजार व परवाना विभाग व अतिक्रमण विभाग यांनी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग काढण्याची कारवाई निरंतर सुरु ठेवावी अशा स्पष्ट सूचना आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत. कोणीही अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग शहरात लावू नये अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे.

    मा.आयुक्‍त यांचे दिनांक २१/०४/२०२२ रोजीच्‍या झालेल्‍या सभेत अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय मालमत्‍तेवर / जागेवर विनापरवानगी अनधिकृत जाहिराती, पोस्‍टर, बॅनर्स, झेंडे पताके इत्‍यादी न लावण्‍याबाबतचे निर्देश आहे. त्‍यानुसार शासकीय जागेवर अनधिकृत पोस्‍टर, बॅनर्स इत्‍यादी लावण्‍यात येवु नये अन्‍यथा महाराष्‍ट्र मालमत्‍तेच्‍या विरुपणास प्रतिबंध करण्‍याकरीता अधिनियम १९९५ अन्‍वये दंड व शिक्षेची तरतुद आहे. तसेच मुंबई प्रांतिक महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम २००३ मधील ६ नियम ४ च्‍या अन्‍वये कोणाही व्‍यक्‍ती संस्‍था सदर वरील नियमाचे उल्‍लंघन करीत असल्‍यास संबधीता व्‍यक्‍ती, संस्‍था यांच्‍यावर महानगरपालिकेतर्फे कार्यवाही करण्‍यात येईल याची नोंद घ्‍यावी असे आवाहन अतिक्रमण पथक प्रमुख, महानगरपालिका, अमरावती यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code