Recent in Technology

Advertisement

Breaking News

जिल्ह्यात 14 एप्रिलला कोरडा दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिका-यांकडून आदेश जारी

    अमरावती (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी दि. 14 एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्यातील सर्व देशी व विदेशी किरकोळ अनुज्ञप्त्या संपूर्ण बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी निर्गमित केले आहेत.

    जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मुंबई दारूबंदी कायद्यामधील कलम 142 (1) अन्वये अधिकाराचा वापर करून अमरावती जिल्ह्यातील सर्व किरकोळ अनुज्ञप्त्या सीएल-3, एफएल-2, सीएलटीओडी-3, एफएलबीआर-2, एफएल-3 आदी सर्व संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी निर्गमित केले आहेत.

    अनुज्ञप्तीधारकांनी व संबंधितांनी या आदेशांचे पालन न केल्यास त्यांच्याविरुद्ध नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आदेशाद्वारे देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code