रासेयो द्वारा भव्य नेत्रतपासणी शिबीर संपन्न

  स्वाती इंगळे/पिंपळखुटा
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  येथील श्री संत शंकर महाराज आश्रमात श्री रामनवमी महोत्सवानिमित्त श्री संत शंकर महाराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा पथकाद्वारे श्री संत बुधाजी महाराज ग्रामीण रुग्णालय येथे महात्मे आय हॉस्पिटल अमरावती यांच्या सौजन्याने भव्य नेत्रतपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  शिबिराचे उद्घाटन श्रीसंत शंकर महाराज कला महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री शरदराव इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ .सुभाष मुरे प्रा.दीपक बोंद्रे ,डॉ.नरेश इंगळे ,विजय कांबडी, उपस्थित होते. रुगणाची तपासणी डॉ ज्ञानेश्वर इखार यांनी केली कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पूजन व हार अर्पण करून करण्यात आली .त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन रासेयो पथकाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या नेत्र तपासणी शिबिरांमध्ये एकूण 78 रुग्णांची नेत्रतपासणी करून त्यापैकी आवश्यक व गरजू 38 रुग्णांना अत्यल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन डॉ नरेश इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ विजय कांबळी यांनी केले.

  कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महात्मेआय हॉस्पिटल चे पदाधिकारी ज्ञानेश्वर इखार सिद्धार्थ कांबळे, प्रणिता डोंगरे ,श्री रामविलास ,श्री सायन कर, तसेच कला महाविद्यालयाचे डॉ सुभाष मूरे, डॉ नरेश इंगळे, कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री प्रशांत जी सेलोकर, प्राचार्य डॉ. सी. यू. पाटील,डॉ. शरद नायक, प्रा.दीपक बोंद्रे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे अमूल्य सहकार्य प्राप्त झाले.