- कोमेजलेली फुले आता फुलू लागली
- बंद हृदयाची दारे आता खुलू लागली
- काळोखाची रात्र आता सरू लागली
- नवयुगाची आता पहाट उजळू लागली
- मनामनात उत्कर्षाची जिद्द जागू लागली
- क्षणाक्षणात कुर्बानी श्रमाची मागू लागली
- सानथोर इतिहास पुर्वजांचा सांगू लागली
- हरितक्रांती येथे जेमतेम आता रांगू लागली
- गतकालीन मुकी पाखरे बोलू लागली
- कालांतराने मुक्तिगीते गाऊ लागली
- युगायुगाची बंदिस्त पाखरे उडू लागली
- नभात आता भ्रमरांची गर्दी वाढू लागली
- वतनदारीवर आपला हक्क सांगू लागली
- मक्तेदारीही आता हळुवार पेंगू लागली
- सूर्यप्रकाशाने लेकरे आता जागू लागली
- चैत्यभूमी नि दीक्षाभूमीला जाऊ लागली
- शाळेत जाऊन आता खुप शिकू लागली
- रस्त्यावरची गर्दी बाबा मात्र पांगू लागली
- धम्माचरणासाठी विहारी जाऊ लागली
- त्रिशरण,पंचशील, वंदना गाऊ लागली
- पाई चालणारी मुले आता धाऊ लागली
- आचार,विचारातून परिवर्तन दाऊ लागली
- -अरुण विघ्ने