• Tue. Sep 19th, 2023

जागतिक आरोग्य दिन निमित्त सायक्लोथॉन रॅली आयोजन

    अमरावती (प्रतिनिधी) : दरवर्षी 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी अव्हर प्लॅनेट अव्हर हेल्थ या घोषवाक्यासह कोविड लसीकरण बाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधुन आरोग्याबाबत तसेच कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करीता आरोग्य विभाग जिल्हा सामान्य रूग्णालय अमरावती, इंडियन मेडीकल असोशिएशन आय.एम.ए अमरावती, वुमन डॉक्टर्स विंग, अमरावती इ.एन.टी असोशिऐशन, अमरावती ओ.बी.जी.वाय सोसायटी,विदर्भ ऑफथॅलमिक सोसायटी, अमरावती डेन्टल असोशिऐशन, असोशिऐशन ऑफ सर्जन ऑफ अमरावती, विदर्भ इ.एन.टी असोशिऐशन, अमरावती जिल्हा ऑफथॅलमिक सोसायटी, दिव्य योग साधना ट्रस्ट, अमरावती ऑटोमोबाइल असोशिऐशन, रोटरी क्लब ऑफ अमरावती, जे.सी.आय. अमरावती, गोल्डन समर्पण हनुमान चालीसा परिवार, जे.सी.आय. अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक आरोग्य दिन निमित्त सायक्लोथॉन रॅली चे आयोजन दि.7 एप्रिल 2022 रोजी सकाळी 6.30 वाजता आय.एम.ए हॉल येथुन करण्यात आलेले आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    सदर रॅलीला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून सुरवात करतील. ही रॅली दहा किलोमिटर असुन अंदाजे एक तास या रॅलीला वेळ लागू शकते. तरी सायक्लोथॉन आरोग्य जनजागृती रॅलीमध्ये आपल्या सायकलसह सर्व जनमानसांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व इंडियन मेडीकल असोशिऐशन अमरावती यांच्या व्दारे करण्यात आले आहे.

    (छाया : संग्रहित)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,