• Sun. Jun 11th, 2023

करजगावात बाबासाहेबाची जयंती उत्साहात संपन्न

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रेला सुरुवात झाली. मागील दोन वर्षापासून कोरोना संक्रमणामुळे बाबासाहेबांची जयंती साजरी करता आली नाही.

    यावर्षी ही बंदी उठल्यामुळे हा महोत्सव गाजावाजा करीत संपन्न झाला. झेंड्या पासून सायंकाळी पाच वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. वाहनावर बाबासाहेबांची भव्य प्रतिमा लावण्यात आली होती. भीम गीतांच्या तालावर तरुण-तरुणी बेभान होऊन थिरकत होते. सर्वच बौद्ध बंधू-भगिनी शिवाय गावातील बरेच युवक आणि प्रतिष्ठित मंडळी सुद्धा या रॅलीत सहभागी झाली होती. जय-भीम च्या गजराने सारे गाव दुमदुमून गेले होते. गावातील प्रमुख रस्त्याने फिरून झेंड्या जवळच मिरवणुकीची मोठ्या जल्लोषात सांगता झाली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष करजगाव च्या सरपंच शीतलताई राठोड या होत्या तर मंचावर,माजी सरपंच रघुनाथजी जाधव,उपसरपंच रामेश्वर चव्हाण, लक्ष्मणराव हिरवे,कृष्णाजी राठोड, आदी उपस्थित होते.

    यावेळी लक्ष्मणराव हिरवे, सुमित जाधव, कृष्णाजी राठोड, संदीप धवणे, कु. टीना राठोड यांची बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे झालीत. तर दीक्षांत बरडे, दीक्षा मनवर यांनी बाबासाहेबावर सुंदर गीते सादर केलीत.बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य पुरस्कार प्राप्त बंधु प्रा. रमेश वर्घट आणि मुख्याध्यापक अर्जुन वरघट या बंधूद्वयांनी गावातील कर्तबगार व्यक्तीच्या सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी 100 मीटर रनिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे हरियाणातील कर्नाल येथे नेतृत्व करणाऱ्या संतोष जाधव,मागील पंचवीस वर्षापासून मराठा सेवा संघ मार्फत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची पेरणी करणारे लक्ष्मणराव हिरवे,डाक कर्मचारी जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल बाबुरावजी ठाकरे, महादीप स्पर्धेत भरघोस यश संपादन केल्याबद्दल कुमारी टिना गजानन राठोड, कृषी संशोधक नंदकिशोर हिरवे, आचार्य (पीएचडी) पदवी मिळाल्याबद्दल प्रा.गोपाल लक्ष्मण चव्हाण आदींचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला तर बालकलाकारांना पुस्तके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

    या कार्यक्रमाला काशिराम जाधव,दिलीप राठोड,देवराव राठोड, मिठू जाधव,राजु दिवे,देवानंद गावंडे,दिनेश राऊत,सुभाष राठोड, नारायण चव्हाण,मनोज राठोड, अशोक जाधव,पुर्णा जी राठोड,जानु चव्हाण,राजु चव्हाण,हे आवार्जून उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. आम्रपाली धवने आणि दिक्षा मनवर यांनी तर आभार प्रदर्शन जगन्नाथ वानखेडे यांनी केले.

    कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मधुकरराव धवणे, केशवराव धवणे, रामहरी धवणे, शंकर धवणे, देविदास बरडे, उत्तमराव बरडे,अवधूतराव बरडे राजू धवणे किसन बरडे, दशरथ बरडे, देविदास मनवर, संजय बरडे, विकास वानखडे, किरण धवणे, धनराज धवणे उमेश बरडे, जगतपाल बरडे, राजपाल बरडे, सागर बरडे, गौरव बरडे, सुमेध धवणे कपिल वानखडे मैनाबाई बरडे, कमलबाई वानखेडे, विमल बरडे,शारदाताई धवणे,आशाबाई वर्घट,रजुबाई धवणे,कोकीळा मनवर,छाया वानखेडे,सिमा जाधव, संगीता बरडे,कांता बरडे, शोभा बरडे,कल्पना बरडे, रंजना बरडे, वनिता वानखडे, प्रतिभा वानखडे शितल धवणे,तन्वी वानखडे,शोभा बरडे,पद्मा धवणे,आरती धवणे आदी बौद्ध उपासक-उपासिका यांनी प्रयत्न केले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *