• Mon. May 29th, 2023

आई-वडिलांची नि:स्वार्थ वारसदार म्हणजे कन्या…!

  *उपकार विसरलेला पुत्र फक्त दावेदार

  एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला होता. तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीकडे जाऊ लागले. तेवढ्यात एक व्यक्ती तिथे आली आणि तिरडी धरणा-यांपैकी एकाचा पाय धरून ओरडू लागला. मेलेला मनुष्य माझे 15 लाख रुपये देणे आहे. त्यामुळे जोपर्यंत माझे क़र्ज़ मला परत मिळणार नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करू देणार नाही असा पवित्रा त्याने घेतलेला…जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघु लागले.

  तेवढ्यात मृत व्यक्तीची मुले बोलू लागली की, आमच्या वडिलांनी कधी आम्हाला या कर्जाच्या बाबतीत सांगितले नाही. त्यामुळे आम्ही हे कर्ज देणार नाही. तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की, मुले जबाबदारी घेत नाही तर आम्ही पण देऊ शकत नाही. आता सगळे उभे राहिले व याने तर प्रेतयात्रा अडवलेली…जेव्हा खूप वेळ झाली तोपर्यंत ही गोष्ट घरातील बायकांपर्यंत पोहोचली होती.

  ही गोष्ट जेव्हा मृत व्यक्तीच्या एकुलत्या एक मुलीला कळाली. तेव्हा तात्काळ तिने आपले दागिने व घरातील ठेवलेले किमती वस्तू,पैसे इ. त्या माणसाकडे पाठविले आणि सांगितले की हे सर्व विकून त्याचे पैसे तुमच्याकडे ठेवा, पण माझ्या वडिलांची प्रेतयात्रा थांबवू नका. मी सर्व कर्ज फेडून टाकेन आणि बाकी रक्कम लवकरच पाठवून देईन.

  आता तो माणूस उभा राहिला व सर्व उपस्थित लोकांना बोलू लागला. खरे पाहता गोष्ट अशी आहे की, मेलेल्या माणसाकडून मला कुठल्याही प्रकारे 15 लाख येणे नाही. तर उलट मी त्याला देणे आहे. परंतु मी याच्या कोणत्याही वारसदारांना ओळखत नव्हतो. म्हणुन मला हा सर्व खेळ रचावा लागला…आता, मला कळाले की या मृत व्यक्तीचा वारस फक्त नि फक्त त्याची मुलगीच असून इतर कुणीच नाही. असे सांगून ती व्यक्ती निघून गेली. आता मुले व भाऊ शरमेने मान खाली घालून फक्त हताशपणे बघत होते.

  मुलगी असणारे खुप भाग्यवान आहेत. कारण मुली आपल्या आई-वडिलांनाच आपली दौलत समजतात. म्हणूनच मुलगी झाली तर खुश व्हायला हवे ना की दुःखी प्रार्थना करा की एक मुलगी मिळावी जी नेहमी स्मरणात ठेवेल.

  -संजय राखडे
  हिवरा(संगम), यवतमाळ
  मो. 8390440919

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *