Header Ads Widget

धुयमाती....

  धुयमातीच्या दिवसी
  रंग रंगोली म्या साई
  अशी कशी होई म्हणे
  दाजी अशी कशी होई !!
  लाडू समजून खाल्ली
  तीन भांगाची हो गोई
  गोळ गोळ मांगे साई
  मांगे पुरणाची पोई !!
  थयथय नाचे साई
  गळा घालून चाकोल्या
  माकड ऊड्या मारून
  मले दाखवे वाकुल्या !!
  केला जीवाचा खकाना
  लई रंगात आली साई
  रंग रंगात रंगून
  साई कारे चुईमुई !!
  म्हणे रंग नोका चोळू
  तंग झाली माही चोई
  अशी कशी होई म्हणे
   दाजी अशी कशी होई !!
   अशी झाली माही औदा
   राज्या साई संग होई
   मन पावित्र्याची खाण
   साई लय साधी भोई !!
   -वासुदेव महादेवराव खोपडे
   सहा.पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
   अकोला 9923488556

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या