Recent in Technology

Advertisement

Breaking News

उलंग...

  चांदणं सांडल | कापूस रानांत
  येचते उन्हात | माऊली गा ||
  भुकेल्या पोटात | उठते काहूर
  डोळ्यातून पूर | वाहतोया ||
  नख्या ओरबडे | पोटऱ्या सोलल्या
  पापण्या ही ओल्या | आसवांनी ||
  वाळक्या झाडाला | बोंडाचं फर्दळ
  दुःखाची वर्दळ | सोबतीला ||
  नशिबाचा येचा | बोटाला जिभाळी
  लिहिलया भाळी | सटवीने ||
  भेगाळली भूई | उलंगल रान
  होरपळे मन | निखाऱ्यात ||
  फाटका पदर | बोंडावानी उल
  काळजात सल | कायमची ||
  -सतिश कोंडू खरात
  वाशिम
  ९४०४३७५८६९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code