Header Ads Widget

बुरा न मानो होली हैं.... शिमगा

    कुणीही खुशाल विका दारू
    चालवावा वरली मटका
    संवेदनाहीन काळीजांना
    केवळ पैशांचाच चटका !!
    वर्दीसंगे नमक हरामी
    हप्ते घेऊन देऊन करू
    पैशांसाठीच जगतो आम्ही
    केवळ पैशासाठीच मरू !!
    खुशाल म्हणा हो भ्रष्टाचारी
    जन महसुल आम्ही चोरू
    शासनाचेच तिजोरिवर
    डल्ला आम्ही सहमते मारू !!
    जनतेचेच आम्ही चाकर
    जन जिवनाशी होळी खेळू
    आरोग्य शिक्षण कचेरीत
    दलाल,भडवे आम्ही पाळू !!
    कामचोर असू शिरजोर
    आम्ही करतो शासन सेवा
    भाबड्यांचा करून शिमगा
    खाऊ आम्ही पुरणाचा मेवा !!
    होई शिमग्याची बोम्ब आम्ही
    केवळ चार दिवस मारू
    झाले गेले विसरून त्यांचा
    राष्ट्र पदके सत्कार करू !!
    -वासुदेव महादेवराव खोपड़े
    सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनी)
    अकोला9923488556

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या