कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूर द्वारा आयोजित राज्यस्तरीय योग स्पर्धेत सेंट थॉमस प्रशासकीय महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे.
आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठद्वारे रामटेक येथे राज्य स्तरीय योग स्पर्धेचे आयोजन केले होते त्यात सेंट थॉमस प्रशासकीय महाविद्यालय अमरावती चा विद्यार्थी निलेश चौधरी यांनी सुवर्ण पदक तर रंजीत जिवाने यांनी ब्रांझ पदक मिळविले आहे.सेंट थॉमस प्रशासकीय महाविद्यालयाने प्रथमच या स्पर्धेत सहभाग घेऊन असे घवघवीत यश संपादन केले आहे.चौधरी व जिवाने यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष डॉ सिकंदर मनवरे प्राचार्य संजीवनी मनवरे आणि योग शिक्षिका प्रा.उज्वला सुरजे यांना दिले.त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भरभरून कौतुक केले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या