अमरावती (प्रतिनिधी) : जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर आयोजित दीक्षाभूमी ऑडिटोरियम नागपूरला दिनांक 27 मार्च २०२२ ला पुरस्कार वितरण व ग्रंथप्रकाशन कार्यक्रम पार पडला.
यावेळी भंते नागार्जुन सुरई ससाई हे हजर होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध मेंदूतज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्रम नागपुर हे हजर होते. त्याच प्रमाणे डॉ सुमा टी. रोडवर कर्नाटक, किशोर गजभिये , प्रा. दीपककुमार खोब्रागडे, सुजित मुरमाडे, रवींद्र तिरपुडे कार्याध्यक्ष गोविंदराव कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रा .संदीप गायकवाड यांच्या वैचारिक लेखसंग्रह शोषित मुक्तीच्या लढाया: भ्रम आणि वास्तव या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. त्याचप्रमाणे या ग्रंथाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा. संदीप गायकवाड यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल रवींद्र तिमांडे, सुरेश खंगार, मंगला मंडपे, सुधीर बाराहाते, विलास गजभिये, मीना राऊत, नागेश वाहुरवाघ, भिमराव गायकवाड, प्राजक्ता उंदिरवाडे, संदीप नगराळे,अरूण विघ्ने,प्रशांतढोले व इतर मित्रांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या