दारव्हा (प्रतिनिधी): दारव्हा येथील प्रतिष्ठित नागरिक सुनील अगमे यांचे वडील मधुकरराव बळीरामजी अगमे यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय ७७ वर्षे होते. त्यांच्या पश्चात मुले सुनील, अशोक, दिपक, मुलगी सौ.रंजना सोनवणे, जावाई सुधाकरराव सोनवणे, स्नुषा सौ.विद्या, सौ. प्रिया, सौ.ज्योती नातवंडं त्रृणाल, हिमांशू, ॠतिका,भूमीका, प्राप्ती, अंतरा अगमे, शिरीष सोनवणे, स्वप्नील सोनवणे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने ते सर्वत्र परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उद्या दि.२५ मार्च २०२२ रोजी सकाळी ९ वाजता स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या