पिंपळखुटा येथील श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर दत्तक ग्राम गव्हा निपाणी (जाळीचे मारुती मंदिर) या ठिकाणी विविध उपक्रमाने संपन्न झाले.या शिबिराचे उद्घाटन स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शरदराव इंगळे यांच्या शुभहस्ते झाले.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष मुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त श्री सुदामराव नागपुरे श्री सुधाकरराव बांते,श्री.संतोषराव नागपुरे विचारपिठावर उपस्थित होते.सात दिवशीय कार्यक्रमाची रूपरेषा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नरेश इंगळे यांनी यावेळी विषद केली.
शिबिरादरम्यान स्वयंसेवक स्वयंसेविका व गावकऱ्यांच्या श्रमदानातून शेततळे खोदण्यात आले तसेच ग्रामसफाई,गव्हा निपाणी ते जाळीचे मारुती मंदिर मार्ग रस्ता सफाई सोबतच पर्यावरण, साक्षरता जनजागृती,अंधश्रद्धा निर्मूलन,व्यसनमुक्ती, स्त्री पुरुष समानता आदी विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम व पथनाट्य स्वयंसेवकांनी सादर केलीत.सोबतच कोरोना लसीकरण व पल्स पोलिओ लसीकरण घेण्यात आले.
शिबिरादरम्यान बौद्धिक सत्रात विविध मान्यवरांची व्याख्याने झाली त्यात प्रामुख्याने पर्यावरण संवर्धनात युवकांची भूमिका या विषयावर छत्रपती महाविद्यालय आसेगाव पूर्णाचे डॉ. मनोज सपकाळ,प्रा.सुषमा थोटे, घर घर सविधान,गाव गाव संविधान याविषयावर उच्च प्राथमिक शाळा शेलोडी तालुका दारव्हाचे मुख्याध्यापक श्री सुधाकर कांबळे,प्रा.विजय कामडी,अध्यात्म आणि विज्ञान या विषयावर विज्ञान अध्यापक मंडळ धामणगाव रेल्वेचे तालुकाध्यक्ष श्री अनंत डूमरे,प्रा, सुषमा कावळे, एकविसाव्या शतकातील स्त्री आणि सबलीकरण या विषयावर छत्रपती विद्यालयाच्या प्रा.ज्योती शेंदुरजने डॉ.मेघा सावरकर, कोरोना काळ : काय कमावलं अन काय गमावलं या विषयावर कान्होजी बाबा महाविद्यालय अंजनसिंगीचे प्रा.अतुल ठाकरे प्रा.दीपक अंबरते प्रा.कविता बानेवार यांनी मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रम दरम्यान प्रास्ताविक व पाहुण्यांचा परीचय डॉ. नरेश इंगळे, सूत्रसंचालन मयुरी रताळे, कोमल गोबाडे, अनमोल मून, नाजूका खंडारे, तर आभारप्रदर्शन हर्षाली लांबाडे, चेतन जाधव, भारती भोयर यांनी केले.
शिबिराचा समारोपीय कार्यक्रम स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. शरदराव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्रीसंत शंकर महाराज कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रशांत सेलोकार, विद्यामंदिर व कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य रामेश्वर नागपुरे कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष मुरे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी आदर्श स्वयंसेवक-स्वयंसेविका म्हणून अनुक्रमे चेतन हरिदास जाधव आणि कु.कोमल मनोहर गोबाडे यांना गौरविण्यात आले.शिबिराचे अहवाल वाचन कु.मयुरी रताळे यांनी केले.प्रास्ताविक प्रा. विजय कामडी, सूत्रसंचालन कु.कोमल गोबाडे अनमोल मून तर संपूर्ण शिबिर आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.नरेश इंगळे यांनी केले.शिबीर यशस्वीते करिता अमित मेश्राम,ओमप्रकाश इंगोले तसेच गटप्रमुख पूनम शिवणकर, शुभम बोरकर सुषमा घावट कोमल गोबाडे,पल्लवी वाट,स्नेहल शेंडे आचल लादे वैष्णवी मेश्राम,दिव्या मेश्राम, भारती भोयर, अनमोल मून चेतन जाधव सागर डाहे,गौरव डफळे, निखिल बांते सह,सर्व महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी शिबीरार्थी, वसतिगृह कर्मचारी गावकरी यांनी विषेश परिश्रम घेतले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या