Header Ads Widget

हा गाव चिमण्यांचा न्यारा...

  गाव वसविला चिमण्यांनी
  या झाडाच्या फांदीवर
  खोपा झुलतो आकाशी
  जीव टांगूनी वा-यावर
  कुण्या शहरी विद्यापिठाच्या
  ह्या विद्यार्थीनी इंजिनीयर
  एकेका काडीने विणती खोपा
  कुणी शिकविली कलाकुसर
  ना जात, देश,धर्माचे बंधन
  एकोप्याने करीती विहार
  गगनाला घालती गवसनी
  आदर्श घ्यावा असा संस्कार
  ऊन्हे असो वा पावसाळा
  वादळात भासती दीपस्तंभ
  उघड्यावरचे जीणे तयांचे
  निसर्गच असे आधारस्तंभ
  समता, स्वातंत्र्य नि बंधुता
  न्यायाने वागती एकमेकांशी
  ना भांडण-तंटा ,हानामारी
  ना सोयर सुतक कशाशी
  ना संपत्ती ना संचय भाकरीचा
  मानवासम माया पिल्लावरी
  संरक्षण करीती स्वतः स्वताचे
  प्रयत्नांती घेती गगनभरारी
  -अरुण विघ्ने

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या