Header Ads Widget

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनी व्याख्यानमाला व सावित्रीच्या लेकिंचा सत्कार संपन्न"

  * प्रा .सौ.अनिता खवले, सौ .पूजा हाडोळे,प्रा.श्रीकृष्ण बनसोड, प्रा.अरुण बुंदेले,सौ. वंदना मडघे, सौ. सुनिता भेले, सौ.अरुणा खारकर,सौ.शिल्पा पाचघरे, डॉ. सौ. उज्ज्वला मेहरे यांनी गाजविली व्याख्यानमाला

  अमरावती: स्थानिक उपेक्षित समाज महासंघ, सर्वशाखीय माळी संघ, सावता व्यायाम व क्रीडा मंडळाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ व्या स्मृती दिनानिमित्त दि.१० मार्च २०२२ रोजी सावता सभागृह ,रामनगर ,अमरावती येथे सावित्रीबाई फुले व्याख्यानमाला व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा सत्कार सोहळा संपन्न झाला.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.गीताताई मडघे(ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या), उद्घाटक सौ. रजनी आमले (सचिव,मनस्विनी महिला फाऊंडेशन ), स्वागताध्यक्षा सौ.सुनंदा बनसोड, प्रमुख अतिथी प्रबोधनकार सौ. वैशाली धाकुलकर, प्राचार्या मिनलताई भोंडे-ठाकरे, पोलीस पाटील सौ. कविता पाचघरे, जि.प.सदस्या पूजाताई हाडोळे,नगरसेविका सौ. सुनीताताई भेले व सौ.वंदनाताई मडघे, उद्योजिका प्रा.सौ.अनिता खवले ,स्मिता संजय घाटोळ,सौ.अरुणाताई खारकर,सौ.जयश्री कुबडे ,सौ.राजश्री जठाळे ,सौ अलका श्रीखंडे होत्या. तर प्रा. श्रीकृष्ण बनसोड (अध्यक्ष ,उपेक्षित समाज महासंघ), प्रा. अरुण बुंदेले (अध्यक्ष, कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले ), प्रा.प्रदीप शेवतकर, संजय देवळे,ओमप्रकाश अंबाडकर, भरतराव खासबागे, दीपक आमले,वसंतराव भडके ,सौरभ नरेंद्रजी वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.उद्घाटक सौ.रजनी दीपक अामले यांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले व सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यानेच आजची स्त्री ही विविध क्षेत्रात गगन भरारी घेत असल्याचे म्हटले.स्वागताध्यक्षा सौ.नंदा श्रीकृष्ण बनसोड यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषणातून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे हौतात्म्य प्रेरणादायी असल्याचे म्हटले. प्रसिद्ध कवी व लेखक प्रा.अरुण बुंदेले यांनी "निखारा" या काव्यसंग्रहातील" क्रांतीज्योती " या स्वरचित वंदन गीताने कार्यक्रमाचा अोनामा केला. सौ. भाग्यश्री बानायत- डिवरे(IAS) यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.

  व्याख्यानमालेतील प्रमुख वक्तागण प्रा.सौ.अनिता प्रदीपराव खवले, जि.प. सदस्या, सौ.पूजा सतीशराव हाडोळे,प्रा.श्रीकृष्ण बनसोड, प्रा .अरुण बुंदेले,सौ.वंदना प्रदीप मडघे,सौ सुनिता मनोज भेले,सौ.अरुण गणेश खारकर,सौ.शिल्पा पाचघरे ,प्रा.डॉ. सौ. उज्ज्वला सुरेश मेहरे यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. याप्रसंगी अर्वाचीन मराठी कवितेच्या जनक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या मानकरी सौ.शारदा अरुण गणोरकर यांचा पुष्पगुच्छ ,शाल व गौरवचिन्ह सन्मानपूर्वक प्रदान करून गौरव करण्यात आला. वऱ्हाड विकासच्या सावित्रीबाई फुले गौरवअंकाचे ओमप्रकाश अंबाडकर,इंजिनिअर भरतराव खासबागे,प्रा अरुण बुंदेले यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

  सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या तसेच कोरोना योद्धा म्हणून कार्य केलेल्या सौ.कल्पना शेवतकर,सौ .कविता पाचघरे (पोलिस पाटील ) सुनंदा साव, डॉ.शिल्पा गहूकर , दलित मित्र शालिनी मांडवधरे या सावित्रीच्या लेकींचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी ठरावाचे वाचन केले.(१)फुले दाम्पत्याला भारत रत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे.(२) शासकीय गर्ल्स हायस्कूलला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे (३)अमरावती नगरित सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा.(४)संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले अध्यासन केंद्र सुरू करण्यात यावे.

  प्रा.गीताताई मडघे यांनी अध्यक्षीय भाषणातून," सावित्रीबाई फुले यांनी अनिष्ठ रुढी व अंधश्रद्धेला विरोध केला. आजच्या वैज्ञानिक युगात महिलांनी विज्ञानवादी होण्याची गरज व्यक्त केली." याप्रसंगी सर्वशाखीय माळी महासंघाच्या महिला आघाडीच्या शहर कार्यकारी अध्यक्षा प्रा. डाँ. सौ. उज्ज्वला सुरेश मेहरे यांना नियुक्ती देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी प्रा.साहेबराव निमकर,डी.एस.यवतकर,अरुण गणोरकर,केशवराव चिंचोळकर, मधुकर आखरे,सुरेशराव मेहरे, अँड.प्रभाकर वानखडे,प्रा. ए. आर. होले ,हभप गोविंद फसाटे,श्रीकृष्ण रहाटे, युवा नेते सुधीर घुमटकर, अशोक आजनकर,सौ. जयश्री कुबडे सौ.लता चिंचोळकर,सौ. पुष्पा निमकर,सौ.कल्पना होले,सौ. सीमा देवळे, सौ रंजना सिनकर,सतीश मेहरे,सौ.मेघा निमकर, सौ.हर्षा होले सौ.सरिता चर्जन,सौ पुष्पा निमकर व बहुसंख्य बंधू भगिनींची उपस्थिती होती. सौ. लता चिंचोळकर यांचे समारोपीय भाषण झाले.कार्यक्रमाचे बहारदार संचालन प्रा.डाँ.उज्ज्वला सुरेशराव मेहरे यांनी केले तर आभार सौ. लता केशवराव चिंचोळकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या