Recent in Technology

Advertisement

Breaking News

पहिली ते बारावी शाळा प्रत्यक्ष अध्यापन पद्धतीने ; शिक्षणाधिका-यांकडून आदेश जारी

    अमरावती: अमरावती जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते 12 वीच्या शाळा नियमितपणे व पूर्णवेळ प्रत्यक्ष अध्यापन पद्धतीने घेण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी ई. झेड. खान व माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत.

    तसा आदेश दोहोंनीही संयुक्त स्वाक्षरीने जारी केला. त्यानुसार जिल्हा परिषद, खासगी, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या पहिली ते बारावीच्या शाळा नियमित पूर्णवेळ सुरू राहतील. शाळेच्या वेळेबाबत कुठेही अनियमितता ठेवू नये, तसेच कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या शाळांत इयत्ता दहावी व बारावीचे परीक्षा केंद्र असेल, त्या शाळांनी माध्यमिक मंडळाच्या सूचनेप्रमाणे नियोजन करण्याचीही सूचना आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code