Header Ads Widget

प्रशांत विठ्ठलराव मेश्राम एमपीएससी आर‍टीओ एएमवीआय या पदावर अनुसूचित जमाती प्रवर्गातून महाराष्‍ट्रात प्रथम

    * गोपालनगर स्‍पर्धा परिक्षा अभ्‍यासिका अमरावती महानगरपालिका विद्यार्थी

    अमरावती : गोपालनगर स्‍पर्धा परिक्षा अभ्‍यासिका, अमरावती महानगरपालिकेचा विद्यार्थी प्रशांत विठ्ठलराव मेश्राम हा एमपीएससी (MPSC) परिक्षेमधून पूर्व परिक्षा तसेच मुख्‍यपरिक्षेचा टप्‍पा पार करुन आरटीओ एएमवीआय (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक) या पदावर महाराष्‍ट्रामधुन अनुसूचित जमाती प्रवर्गातुन प्रथम स्‍थान प्राप्‍त केले.

    याप्रसंगी गोपालनगर स्‍पर्धा परिक्षा अभ्‍यासिकेमध्‍ये ज्‍यांच्‍या संकल्‍पनेतुन गोपाल नगर अभ्‍यासिका उभी झाली असे माजी सभागृह नेता सुनिलभाऊ काळे तसेच उपायुक्‍त नरेंद्र वानखडे यांच्‍या तर्फे प्रशांत मेश्राम व त्‍याचे आई वडील यांचा सहपरिवार सत्‍कार करण्‍यात आला. तसेच अमरावती महानगरपालिकेमध्‍ये आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर यांनी त्‍यांच्‍या कक्षामध्‍ये प्रशांत मेश्राम याचा सहपरिवार विशेष सत्‍कार करण्‍यात आला. याप्रसंगी त्‍याला त्‍याच्‍या पुढील वाटचालीस शुभेच्‍छा देण्‍यात आल्‍या.

    या सत्‍कार प्रसंगी उपायुक्‍त सुरेश पाटील, केंद्र प्रमुख श्रीधर हिवराळे, किशोर गायधने, विशाल इंगोले, चेतन तसरे, अब्‍दुल रशीद तसेच संचालन वैष्‍णवी घोडे तसेच मोठ्या संख्‍येने गोपालनगर स्‍पर्धा परिक्षा अभ्‍यासिकेचे विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या