Recent in Technology

Advertisement

Breaking News

" संत तुकाराम "

तुकाराम। सोळाशे आठला ॥
देह जन्मा आला। वसंताला॥१॥

वडील बोल्होबा। कनकाई आई॥
 सुसंस्कार देई। तुकाराम॥२॥

साक्षात्कारी संत । निर्भिड लेखन।
 चिंतन मनन। समाजाचे॥३॥

प्रबोधन कार्य । कीर्तनात केले॥
अभंग गायिले। जनांसाठी॥४॥

परिवर्तनाचे । शब्द अभंगात 
सुधारक संत । तुकाराम॥५॥

वैचारिक संत। एक वारकरी॥
सम नर- नारी । तत्त्वज्ञान॥६॥

पूर्ण महाराष्ट्र। न्हाला अभंगात॥
वैचारिक वात । पेटविली॥७॥

नवविचारांची । अभंग पेरणी॥
रोखठोक वाणी। तुकोबांची॥८॥

व्यापारी असून। ऋण माफ केले॥
 पदरी जे आले । जना दिले॥९॥

जनांच्या मुखात। अभंग जीवंत॥
समाज जागृत । विचारांनी ॥१०॥

काव्यात गोडवा । अभंग रसाळ॥
सोपी नि सरळ । शब्दकळा॥११॥

दर्शन  देहूला । तुकोबांचे घेऊ॥
अभंगाला गाऊ। आनंदाने॥१२॥

जणांच्या हृदयी । तुकोबांची गाथा॥
टेकवू या माथा । चरणाशी॥१३॥

आज तुकाराम। बीज स्मृतिदिन॥
करांनी वंदन। कोटी कोटी॥१४॥

              
 - प्रा अरुण बाबारावजी बुंदेले,
    रुक्मिणीनगर,अमरावती.
    भ्रमणध्वनी:-८०८७७४८६०९.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code