Header Ads Widget

" क्रांतिज्योती "

करितो क्रांतिज्योतीला ।
नमन अमुचे माँ सावित्रीला॥धृ॥

स्री शुद्रांना देऊन शिक्षण।
केले तयांचे तूच रक्षण।
विद्यादानाने जागृत मन।
कर  जोडितो तपस्विनीला॥१॥

 चालविली तू स्री संघटना।
 थांबविले तू बाल हत्त्यांना।
वाचविले लाखो विधवांना।
स्पर्श करितो तव चरणाला॥२॥

जोतीची जहाल अर्धांगिणी तू ।
क्रांतीची पेटती मशाल तू।
 निर्भयतेची रण रागिणी तू ।
कर हे जुळती क्रांतिकार्याला॥३॥

 सावित्रीचे पुण्यस्मरण करावे।
क्रांतिमाचे गीत गायन करावे।
 क्रांतिज्योतीचे कर्मगीत गावे।
नमन अमुचे तव चरणाला ॥४॥

मोल दिले तू स्त्री शिक्षणाला।
 घडविले तू नव समाजाला।
आचरावे अनमोल तत्त्वाला।
प्रणाम करू या क्रांतिज्योतीला॥५॥
                             
-प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
  रुक्मिणी नगर, अमरावती.
  भ्रमणध्वनी:-८०८७७४८६०९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या