- होळीचा हा सण।
- आनंदाचा क्षण।
- शुद्ध करा मन।
- होळी दिनी ॥१॥
- परिसर सर्व।
- स्वच्छच करावा।
- कचरा जाळावा ।
- होळीतच॥२॥
- वाईट विचार।
- देऊ या सोडून।
- करू या दहन।
- होळीतच॥३॥
- सद्गुणांचा संग।
- सर्वांनी धरावा।
- संकल्प करावा।
- सर्वांनीच॥४॥
- होळीच्या या दिनी।
- हार्दिक शुभेच्छा।
- मनस्वी सदिच्छा।
- सर्वांनाच॥५॥
- - प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले,
- रुक्मिणी नगर ,अमरावती.
- भ्रमणध्वनी:-८०८७७४८६०९.
- (Images Credit : Latestly Marathi)
0 टिप्पण्या