Header Ads Widget

प्रत्‍येकाने लसिकरण करुन घेणे काळाची गरज-उपायुक्‍त नरेंद्र वानखडे

* कोविड१९ लसिकरण संदर्भात घेतला आढावा 

अमरावती :कोव्‍हीड काळामध्‍ये प्रत्‍येकाने या शहराला मदत केली भविष्‍यातील हानी टाळण्‍यासाठी शहरातील प्रत्‍येक पात्र व्‍यक्‍तीने वय १५ ते १८ व १८ चे वर पहिला व दुसरा डोस सोबत बुस्‍टर करिता पात्र असलेल्‍यांनी लसिकरण करुन घेण्‍याचे आवाहन या बैठकीत करण्‍यात आले याबाबत उपायुक्‍त नरेंद्र वानखडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली सोमवार दिनांक १४ मार्च,२०२२ रोजी कोविड-१९ लसिकरण संदर्भात आढावा बैठक मनपा कॉन्‍फरन्‍स हॉल येथे घेण्‍यात आली. सदर बैठकीत वैद्यकीय  आरोग्‍य अधिकारी डॉ.विशाल काळे, डॉ.विक्रांत राजुरकर, डॉ.जयश्री नांदुरकर, डॉ.मानसी मुरके, सर्व डॉक्‍टर उपस्थित होते. या बैठकीत कोविड-१९ लसिकरण संदर्भात सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली. तसेच सर्व स्‍त्री वैद्यकीय अधिकारी यांना सिटी टास्‍क फोर्सची बैठक घेवुन लसिकरण वाढवण्‍याचे आदेश देण्‍यात आले.   

उपस्थितांना निर्देशीत केले की, त्‍यांनी लसिकरणाबाबत व्‍यापक जनजागृती करावी. अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील ज्‍यांना लस देता येईल अश्‍या सर्व घटकांना लस घेण्‍याबाबत सुचित करावे. लस उपलब्‍ध असून शासनाने ज्‍या घटकांना लस देण्‍याचे निर्देश दिले आहे त्‍या सर्व नागरिकांनी लसिकरणाचा लाभ घ्‍यावा. सदर बैठकीत उपायुक्‍त नरेंद्र वानखडे यांनी सर्व शाळेतील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्‍यांनी अद्यापपर्यंत लस घेतली नाही कॉलेज कॅंम्‍प लावावेत व त्‍यांनाही तात्‍काळ लसिकरण करावे असे निर्देश दिले आहे. तसेच विविध आस्‍थापना व शाळा यांचे लसीकरण झाले असल्‍याचे तपासणी करण्‍याचे निर्देश दिले. त्‍याचप्रमाणे सद्यास्थितीत सुरु असलेले लसिकरण केंद्र व्‍यतिरिक्‍त जिथे शक्‍य असेल तसेच विविध ठिकाणी लसिकरण शिबीर आयोजित करुन जास्‍तीत जास्‍त लसिकरण करण्‍याकरीता जनजागृती करण्‍याचेही निर्देश सदर बैठकीत दिले आहे.

या बैठकीत १० वी व १२ वी विद्यार्थ्‍यांचे शेवटच्‍या पेपरच्‍या दिवशी लसीकरणाचे कॅंम्‍प लावण्‍याबाबत व १० वी, १२ वी वरिल कॉलेजमध्‍ये उद्यापासुन शिबिराचे नियोजन करण्‍याचे सुध्‍दा निर्देश दिले.    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या