Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

दैनिक कळंब नगरीचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न

    सुनील शिरपुरे/ झरीजामणी
    मा.श्री.प्रा.वसंतराव पुरके सर यांच्या उपस्थिती

    जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी, शेतकरी-शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार व महिलांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या व त्यांच्यावर शासन-प्रशासनाकडून होणा-या अत्याचाराला वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी जनसेवेचे ब्रीद घेऊन संपादक श्रीकांत देशमातुरे सर यांनी 'कळंब नगरी' नावाचं दैनिक वृत्तपत्र सुरू केले आहे. महिलांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी, स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी मज्जाव करणा-या वृत्तीच्या विरोधाला न जुमानता त्यांना शिक्षण देण्यासाठी सर्वप्रथम पुढाकार घेणा-या 'सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्य' काल 10 मार्च 2022 गुरुवार रोजी कळंब नगरीचा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता.

    या दैनिकाच्या प्रथम अंकाचे प्रकाशन खालील मान्यवरांच्या उपस्थित त्यांच्याच हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष मा.श्री.प्रा.वसंतराव पुरके सर माजी शिक्षणमंत्री तथा उपाध्यक्ष आदिवासी विकास महामंडळ नाशिक, प्रकाशक मा.श्री.प्रवीणभाऊ देशमुख माजी अध्यक्ष जि.प.यवतनाळ तथा संचालक कृ.उ.बा.स.मुंबई हे होते. तर विशेष निमंत्रित मा.श्री.नरेंद्र सोनारकर विदर्भ अध्यक्ष राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, मा. श्री निलेश ठाकरे विदर्भ संघटक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ मा श्री निलेश किरतकर मुख्य संपादक साप्ताहिक अधिकारनामा मा श्री राजु तुरणकर संपादक लोकवाणी जागर मा.श्री.मिलिंद नरांजे संपादक मिशन इंडिया टिव्ही, मा.श्री.फिरोज लाखाणी संपादक साप्ताहिक राळेगाव समाचार, मा.अॅड. प्रफुल चव्हाण जिल्हा सरचिटणीस भाजपा यवतमाळ, मा.अॅड.फिडेल बायदानी राळेगाव, मा.अॅड.डी.जी.तेलंगे कळंब, अॅड.सौ.सोनाली चिचाटे(अंबाळकर) कळंब व प्रमुख अतिथी मा.श्रीमती अफरोज बेगम फारुख अहेमद सिध्दीकी नगराध्यक्ष न.प.कळंब, मा.श्री आकाश कुटेमाटे उपनगराध्यक्ष न.प.कळंब, मा.श्री सुनील चव्हाण तहसिलदार कळंब, मा.श्री.अजीत राठोड पोलीस निरिक्षक कळंब, मा.डॉ.विजय आकोलकर तालुका आरोग्य अधिकारी कळंब, मा.श्री.सुभाष मानकर गटविकास अधिकारी पं.स.कळंब, मा.श्री.एस.एस.भगत तालुका कृषी अधिकारी कळंब, मा.श्रीमती वंदना नानोटे प्रकल्प अधिकारी ए.बा.वि.से.यो.कळंब, मा.श्री.प्रशांतभाऊ डेहनकर स्वच्छता ब्रँड अँबिसिडर न.प.कळंब, मा.श्री.नंदु परळीकर मुख्याधिकारी न.प.कळंब, मा.श्री.दिनेश वानखेडे माजी सरपंच थाळेगाव, मा.श्री.रुपेश राऊत नगरसेवक न.प.कळंब, मा.श्री.अशोकराव उमरतकर उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा पत्रकार संघटना तसेच कळंब नगरीतील पत्रकार बांधव सर्वश्री शेषेराव मोरे, गजानन अक्कलवार, प्रशांत रोहणे, विनोद ठाकरे, दिलीप डवरे, आशिष कुंभारे, अनुप साळवे, रुस्तम शेख हे होते.

    अध्यक्षीय भाषणात मा.वसंतराव पुरके सर समर्पक व मोलाचे मार्गदर्शन अगदी साहित्यिक भाषेत करत शिक्षकीय पेशात समजावून सांगितले. तसेच या कार्यक्रमासाठी श्रीकांत देशमातुरे सरांचे मार्गदर्शक तथा त्यांचे गुरूवर्य श्री मोरेश्वरराव ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा श्री अॅड तेलंगे साहेब यांनी तर आभार प्रदर्शन समाजिक कार्यकर्ते अशोकराव उम्रतकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code