नागपूर : भटक्या विमुक्तांचा गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व आर्थिक विकास झाला नाही. शासनाने घरदार नसणाऱ्या या अनिकेत समाजाकडे कधीही लक्ष दिले नाही त्यामुळे भारत सरकारने भटक्या विमुक्तांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नुकतीच सिड योजना सुरु केली असून त्याचा लाभ भटक्या विमुक्तानि घ्यावे असे आवाहन भटके विमुक्त कल्याण विकास बोर्डचे केंद्रीय अध्यक्ष व नीती आयोगाचे सदस्य मा श्री दादासाहेब इदाते यांनी केले. दि.२७ फेब्रुवरी रोजी रविभवन नागपुर येथे भटके विमुक्त आर्थिक सक्षमीकरण (SEED) अंतर्गत योजना प्रगटीकरण व विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड,मोहन जाधव,प्रा. ताराचंद चव्हाण, श्रीपत राठोड, दत्तराव पवार धर्मेन्द्र जाधव व इतर अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या शिष्टमंडलाने दादा इदाते यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व निवेदनही सादर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भटके-विमुक्त कल्याण विकास बोर्डचे केंद्रीय अध्यक्ष व नीती आयोगाचे सदस्य मा श्री दादासाहेब इदाते उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे, संघर्ष वाहिनीचे संघटक श्री दिनानाथ वाघमारे, बंजारा समाजाचे नायक श्री आत्माराम राठोड, गाडीलोहार समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री हिवलेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना श्री दादासाहेब इदाते यांनी सांगितले की, केंद्र सरकारने इदाते आयोगाचा अहवाल स्विकारल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करणे हे प्राथमिक कर्तव्य होते. यासाठी भटके विमुक्त कल्याण विकास बोर्डच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रथमच भटक्या विमुक्तांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सिड योजना तयार झाली आहे. या योजनेंतर्गत स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या डीएनटीच्या विद्यार्थ्यांच्या कोचिंग क्लासेसचा संपूर्ण खर्च भारत सरकार करणार आहे तर आयुष्यमान भारत अंतर्गत आरोग्य विमा व औषधोपचारांसाठी प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपये उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. छोट्या छोट्या गटांना कौशल्य विकासासाठी, योजनेसाठी निधी उपलब्ध करुन देणार असून डीएनटी समुदायांमधील लोकांना पंतप्रधान आवास योजना अंतर्गत डीएनटीचा वेगळा विभाग करून भारत सरकार आर्थिक मदत करणार आहे. स्वातंत्र्य, समता, बंधूता याची पायाभरणी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील सामजिक लोकशाहीचा एक नवा अध्याय यनिमित्ताने सुरू झाला असून या योजनेच्या प्रचार प्रसारासाठी भटके-विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावे, असे आवाहन श्री दादासाहेब इदाते यांनी केले. याप्रसंगी भटक्या विमुक्त चळवळीत काम करणारे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या