- नाही गवरी चाकोली
- नाही लाकडाची मोई
- अरे घेन्न बाबु आता
- कशी पेटोशील होई !
- माणूस पेंरे माणूस
- नाही पेरलीत झाड
- अग्नि साठी तडफती
- आज मसनात हाड !
- बेईमानी,दुराचार
- वाढला रे ठाईठाई
- दंडावयास दानवा
- कुणी नृसिंहच नाही !
- झाली होईले पारखी
- गोड पुरणाची पोई
- बोम्ब कशी मारशील
- तू आता होई रे होई !
- भ्रष्ट झालेत साहेब
- नेता ईमानदार न्हाई
- कुणा कुणा मारशील
- आता बंदूकची गोई !
- -वासुदेव म खोपड़े
- सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
- अकोला 9923488556
- (Images Credit : Hari Bhoomi)