अमरावती : जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 22 विविध केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आल्याची माहिती डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. 12 ते 14 वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणासाठी ‘कॉर्बेवॅक्स’ (Corbevax) लस वापरण्यात येत आहे. जिल्ह्याला अद्यापपर्यंत 30 हजार 600 लस उपलब्ध झाल्याचे डॉ. रणमले यांनी सांगितले. होळी, धुलिवंदन सणांमुळे आज प्रतिसाद कमी आहे. तथापि, लवकरच या लसीकरणाचेही विस्तारीकरण होणार आहे. त्याचप्रमाणे, 60 वर्षांवरच्या सरसकट सर्वांना आता बूस्टर डोस घेता येणार आहे. त्यादृष्टीनेही केंद्रे सुसज्ज करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.