• Sat. Jun 3rd, 2023

होई …

    नाही गवरी चाकोली
    नाही लाकडाची मोई
    अरे घेन्न बाबु आता
    कशी पेटोशील होई !
    माणूस पेंरे माणूस
    नाही पेरलीत झाड
    अग्नि साठी तडफती
    आज मसनात हाड !
    बेईमानी,दुराचार
    वाढला रे ठाईठाई
    दंडावयास दानवा
    कुणी नृसिंहच नाही !
    झाली होईले पारखी
    गोड पुरणाची पोई
    बोम्ब कशी मारशील
    तू आता होई रे होई !
    भ्रष्ट झालेत साहेब
    नेता ईमानदार न्हाई
    कुणा कुणा मारशील
    आता बंदूकची गोई !
    -वासुदेव म खोपड़े
    सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
    अकोला 9923488556
    (Images Credit : Hari Bhoomi)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *