शेवट…

    दुर जातांना तुझ्यापासून मी,
    तुझ्यातच हरवत होते…
    तुझ्याासुन निरंतर जाऊन मी,
    माझ्यातच दुरावत होते…
    होत पेन कागद हातात.., पण,
    त्याकडे स्थिर मी बघत होते.., कदाचित,
    मी माझ्याच मनात शब्दांच

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    शोध घेत होते…
    खूप काही हीलायचे होते..,पण,
    सुरुवात करावी कुठे हे कळत नव्हते…
    जेव्हा कळलं काही तेव्हा…
    शब्द मात्र वळत नव्हते…
    दुर गेल्यावर परत मागे वळून,
    बघावं वाटतं होते…, पण,
    बघितलं तेव्हा कळलं कुठेतरी,मी
    स्वतःतच हरवले होते…
    मग, मी माझ्याच जळक्या श्वासांना
    आवरत होते…
    तुझ्याच आठवणीत पुन्हा नेत्र विलुप्त
    होत होते…
    -निलिमानिवृत्ती बोरकर
    वायगाव, जि.भंडारा