अमरावती : जिल्ह्यात अमरावती, चांदूर बाजार व तिवसा या तीन तालुक्यांत प्रत्येकी एक याप्रमाणे नोंदणीकृत शेतकरी गटांना 90 टक्के अनुदानावर मोबाईल संत्रा ज्युस सेंटर उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी आत्मा, उमेद, माविम आदींकडे नोंदणी असलेल्या गटांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. ए. धापके यांनी केले आहे.
Contents hide
अर्जाचा विहित नमुना अमरावतीत कॅम्पमधील विसावा कॉलनीतील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात किंवा दुर्गापूरच्या कृषी विज्ञान केंद्रात उपलब्ध आहे. दि. 28 मार्चपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- (Images Credit : Hari Bhoomi)