• Sat. Jun 3rd, 2023

मालमत्‍ता कर न भरल्‍यास होणार जप्‍तीची कारवाई, थकीत करापोटी बॅटरी जप्‍त -उपायुक्‍त नरेंद्र वानखडे

    * ३१ मार्चपर्यंत मालमत्‍ता कर भरा आणि दंडामध्‍ये २५ टक्‍के सुट मिळवा व जप्‍तीपासुन मुक्‍ती मिळवा

    अमरावती : उपायुक्‍त तथा मध्‍य झोन क्र.२ सहाय्यक आयुक्‍त नरेंद्र वानखडे यांच्‍या मार्गदर्शनात व नेतृत्‍वाखाली मध्‍य झोन क्र.२ मधील कर वसुली वार्डात थकीत मालमत्‍ता धारकांना दिलेल्‍या जप्‍तीच्‍या वसुली करीता धडक मोहीम राबविण्‍यात येत आहे. तरी सर्व मालमत्‍ता धारकांनी आपल्‍याकडील थकीत असलेल्‍या मालमत्‍ता कराची रक्‍कम तात्‍काळ मनपाला भरणा करुन होणा-या जप्‍तीची कारवाई टाळावी. वरील मोहीम अंतर्गत दिनांक १० मार्च,२०२२ रोजी वार्ड क्र.२३ रॉयली प्‍लॉट या वार्डातील थकीत मालमत्‍ता धारकांच्‍या थकीत कर वसुलीकरीता जप्‍ती पथकाद्वारे मालमत्‍ता कर क्र.२९५/५ गुलशन टावर येथील मालमत्‍ता धारक सुनिल कुमार ब्रिजलाल अडवानी यांच्‍या मालमत्‍तेवरील थकीत रक्‍कम १,४७,५३१, मालमत्‍ता क्र.२९८/१४एबीसी मालमत्‍ता धारक श्रीमती रितु सुनिल कुमार अडवानी यांच्‍या मालमत्‍तेमधील भोगवटदार रिलायन्‍स निप्‍पान थकीत रक्‍कम ३,६६,४२७ या मालमत्‍तेच्‍या थकीत करापोटी ६ लक्ष रुपये वसुल करण्‍यात आले. मालमत्‍ता क्र.३११ मालमत्‍ता धारक विनोद तुलसीराम साहु (हॉटेल) मोफिसल प्‍लॉट या मालमत्‍तेवरील थकीत रक्‍कम ३२,१५१ वर २५ टक्‍के सुट वगळता २८,८१६ रुपये वसुल करण्‍यात आले. मालमत्‍ता क्र.१७०/१०,११ मालमत्‍ता धारक प्रणय रा. मालविय यांचे भोगवटदार दातेराव एस.के.टायर मोर्शी रोड यांच्‍याकडे थकीत रकमेपोटी ५९,००० रुपये वसुल करण्‍यात आले. मालमत्‍ता क्र.३३९/० मालमत्‍ता धारक डि.डि.सिकची यांच्‍या मालमत्‍तेतील भोगवटदार एक्‍साईड बॅटरी या मालमत्‍तेवर थकीत असलेले ६६,३२० रुपये च्‍या मोबदल्‍यात जप्‍ती कारवाई अंतर्गत सदर मालमत्‍तेमधून ३ नग बॅटरी जप्‍त करण्‍यात आल्‍या.

    तरी सर्व मालमत्‍ता धारकांनी आपल्‍याकडील थकीत असलेल्‍या मालमत्‍ता कराची रक्‍कम तात्‍काळ मनपाला अदा करुन होणा-या जप्‍तीची कारवाई टाळावी असे आवाहन अमरावती महानगरपालिकेने केले आहे.सदर जप्‍ती कारवाई मोहीममध्‍ये उपायुक्‍त (सा.) नरेंद्र वानखडे व सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी बी.एन. जोगी, कर निरीक्षक अशोक बारांगोळे, वसुली लिपिक विनोद मार्वे, फैयाज खान, विकी पाल, सहाय्यक अभियंता वैभव काळे, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

    मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांनी ३१ मार्च, २०२२ पर्यंत आपल्या मालमत्ता करांची थकीत रक्कम अधिक ७५ टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास त्यांना २५ टक्के इतक्या दंडात्मक रक्कमेवर सूट मिळणार आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *