पोदार शाळा फि वाढीबाबत पालकांचा एल्गार..!

    अमरावती :अमरावती शहरातील पोदार शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थांच्या पालकांची बैठक रविवार दि.13 रोजी सिटी सेंटर कॉम्प्लेक्स पंचवटी गाडगे नगर अमरावती येथे पोदार पालक सभेचे सह सचिव अँड. सिद्धार्थ गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    सभेमद्धे पालकांनी पोदार शाळेविरूध्द तक्रारींचा उहापोह केला.गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे प्रचंड प्रमाणामध्ये मनुष्यहानी व आर्थिक हानी झालेली आहे. या कालावधीमध्ये शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की शालेय शुल्कामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ नको परंतु असे आढळून आले आहे की पोद्दार प्रशासनाने शालेय शुल्कामध्ये पालक सभेला विश्वासात न घेता शासनाच्या अध्यादेशाचे उल्लंघन करीत 18 टक्के फी वाढ केलेली आहे. सत्र 2019-20 इयत्ता पाचवी ची फीस 41 हजार 500 रुपये होती. सत्र 2021-22 इयत्ता पाचवी ची फीस ही 49500 रुपये केली गेली आहे सत्र 2021-22 एकूण फी वाढ ही सात हजार पाचशे रुपये झालेली आहे ही वाढ पूर्ण फीच्या 18 टक्के आहे.

    अमरावती विभागातील कोणत्याही शाळेने ही वाढ केलेली नाही तसेच शासन निर्णय 12 ऑगस्ट 2021 प्रमाणे शालेय शुल्कामध्ये पंधरा टक्के सवलत देण्यात यावी असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत पोद्दार प्रशासनाने स्कूल माफिया प्रमाणे सवलत देण्याऐवजी 18% फि वाढ केली आहे. तसेच सत्र 2021-22 हे एप्रिल 2021 पासून सुरू झालेले आहे.पुरेसा वेळ मिळाल्यानंतर पण सर्व विषयाचा अभ्यासक्रम आजतागायत पूर्ण झालेला नाही. फक्त 70% टक्के अभ्यासक्रम हा घेण्यात आलेला आहे. गणित,इंग्रजी, हिंदी,एनवोर्मेन्ट सायन्स हे महत्त्वाचे विषय पूर्ण घेण्यात आलेले नाहीत त्यामुळे पुढील वर्षात होणाऱ्या या अभ्यासक्रमाच्या आकलनावर फरक पडणार आहे. तसेच मागे सत्रात घेण्यात आलेल्या इतर परीक्षा जश्या की ओलंपियाड, गणित संबोध परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा एस. ओ.एफ. यामध्ये विद्यार्थी मागे पडत आहेत.मुलांचे इतर कोणतेही कार्यक्रम या कोरोना काळा मुळे झालेले नाहीत तसेच प्रयोगशाळा, गेम्स अँड स्पोर्ट्स छंदवर्ग व इतर कार्यक्रम झालेले नाहीत त्यामुळे झालेली फी वाढ की अनाकलनीय आहे. त्यामुळे पोद्दार प्रशासनाने “सेवा तेवढी फि” या व्यावसायिक तत्वांचा अवलंब करीत यंदा वाढविलेली 18% फि कमी करून उर्वरीत फि मद्धे 50% या सत्रामध्ये शैक्षणिक शुल्कामद्धे सवलत द्यावी अशी एकमुखी मागणी पालकांनी केली आहे अन्यथा एकही पैसा न भरण्याचा मानस या बैठकीत करण्यात आला. बैठकीला अँड. सिद्धार्थ गायकवाड,अश्विन वाठ, पायल मोहोड,सुशीला भोगे, सोनाली लेंडे, श्रीकांत देशमुख, शशिकांत काळे, निलेश देवतळे, जितेंद्र गनोरकर, पवन वानखडे, शरद काटे, संजय धोटे, निलेश देशमुख, रुपेश टाले, मिलिंद कोकाटे, किशोर रूपनारायण, मिलिंद गनगणे, नामदेव लेंडे, विनोद देशमुख, निलेश म्हसकर, रवींद्र ईँगोले, अभिजीत आबदेव, रविकुमार अढउ, एच बी डहाके, ए एस वानखडे, मिलिंद काळबांडे, डॉ.आशिष वानखडे, डॉ एन आर् ठाकूर, सूरज मडावी, विवेक हाडोळे सह अनेक पालक उपस्थित होते.