नवनाथ रणखांबे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान

    अमरावती(प्रतिनिधी) : नवनाथ रणखांबे यांच्या अमुल्य योगदानाबद्दल जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्यावतीने दीक्षाभूमी, नागपूर येथील ऑडिटोरियम सभागृहात दुपारी १२ वाजता प्रमुख अतिथी भंते नागार्जून सुरई ससाई ( अध्यक्ष, प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती) यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार नवनाथ रणखांबे यांना देऊन गौरविण्यात आले आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा वर्धापन दिन ,पुरस्कार वितरण समारंभ , ग्रंथ प्रकाशन व सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी प्रा. दीपककुमार खोब्रागडे (अध्यक्ष, जागतिक आंबेडकरी साहित्य महामंडळ), उदघाटन डॉ. चंद्रशेखर मेश्राम ( आंतरराष्ट्रीय मेंदूरोग तज्ञ), डॉ.रवींद्र तिरपुडे (कार्यवाह) डॉ. गोविंदराव कांबळे (कार्याध्यक्ष), सुजित मुरमाडे (सरचिटणीस) डॉ. सुमा टी. रोडनवर (हिंदी विभाग प्रमुख, मंगलूर विद्यापीठ) आदी मान्यवर उपस्थित होते.

    नवनाथ रणखांबे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्य वैचारिक चळवळच्या आंदोलनात आघाडीवर असणारे व्यक्तिमत्त्व आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते प्रचार आणि प्रसार करीत आहेत.”नागपूर हे ऐतिहासिक शहर प्रज्ञासूर्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या धम्मदीक्षा सोहळ्यामुळे या शहराची नोंद जगाच्या इतिहास झाली आहे. बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र, धम्मक्रांतीचे विध्यपीठ, प्रेरणापीठ, क्रांतिपीठ, विचरपीठ, तत्वज्ञानपीठ, शक्तीपीठ, वैचारिक आंदोलनाचे नागपूर शहर याठिकाणी आज पहिल्यादाच आलो आहे. तो ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी! नागपूरच्या साहित्यिकांनी माझ्य ‘जीवन संघर्ष’ पुस्तकावर परीक्षणे लिहिल्यामुळे येथील साहित्यिक आणि या शहरातील प्रसार माध्यमाद्वारे मी अगोदरच येथे पोहचलो आहे. या शहराचा आणि माझा पिढ्यानपिढ्याचा संबंध आहे. डॉ. बाबासाहेब हेच माझी प्रेरणा, ऊर्जा आणि शक्ती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन मी विविध क्षेत्रात कार्य करीत आहे. आज त्यांच्या नावाने मिळणारा मानाचा पुरस्कार दीक्षाभूमीवर मला मिळतो आहे याचा आनंद होतो आहे. सद कार्य करण्यासाठी मला ऊर्जा आणि प्रेरणा मिळली आहे. आता अजून माझ्यावर सामाजिक जबाबदारी आणि बांधिलकी वाढली आहे.” असे नवनाथ रणखांबे यांनी यावेळी बोलतांना मत व्यक्त केले.