येथील श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे आदर्श स्वयंसेवक व स्वयंसेविका म्हणून अनुक्रमे चेतन हरिदास जाधव आणि कु.कोमल मनोहर गोबाडे यांची निवड करण्यात आली.राष्ट्रीय सेवा योजना पथका अंतर्गत नियमित कार्यक्रम व विशेष श्रम संस्कार शिबिरातील विविध उपक्रमामध्ये उस्फूर्तपणे सहभाग आणि विशेष कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो.दत्तक ग्राम गव्हा निपाणी (जाळीचे मारोती मंदिर) येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप कार्यक्रमात कु.कोमल गोबाडे आणि चेतन जाधव यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री शरदराव इंगळे, कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रशांत सेलोकार प्राचार्य डॉ.सुभाष मुरे प्राचार्य रामेश्वर नागपुरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.नरेश इंगळे उपस्थित होते त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक स्वयंसेविका सह विविध क्षेत्रातील मान्यवर आप्तस्वकीय यांनी कौतुक केले आहे.