• Wed. Jun 7th, 2023

उन्हाचा तडाखा कायम ; उष्माघातापासून बचाव करा

    अमरावती : भारतीय मौसम विभाग, नागपूर यांच्या अंदाजानुसार विदर्भात उष्णतेची लाट येत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या काळात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय दक्षता घ्यावी, यासाठी अमरावती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी खालीलप्रमाणे आवश्यक खबरदारी घ्यावी.

    उष्माघातापासून बचाव करण्यासाठी…

    तीव्र उन्हात मुख्यत: दुपारी 12 ते 3 या दरम्यान बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पित राहावे. शक्यतो हलक्या रंगाच्या सुती कपडयांचा वापर करावा. गडद, घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे. घराबाहेर पडतांना छत्री, टोपी, गॉगलचा वापर करावा. मद्य, चहा, कॉफी, व शीतपेये व शिळे अन्न खाणे टाळावे. उन्हात काम करत असतांना आपला चेहरा व डोके ओल्या कपड्याने झाकावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरिक श्रमाची कामे टाळावी.चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरित डॉक्टरकडे जावे. ओ. आर. एस., लस्सी, ताक, लिंबू पाणी इत्यादी घरगुती शीतपेयांचे भरपूर सेवन करावे. प्राण्यांना सावलीत ठेवून त्यांना भरपूर पाणी प्यायला द्यावे.

    उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या व्यक्तीचा उपचार

    अशा व्यक्तीला एखाद्या थंड जागी ठेवा. शरीराचे तापमान खाली आणण्याचा प्रयत्न करा. ओल्या कपड्याने त्याला पुसत रहा. डोक्यावर थंड पाणी टाका. व्यक्तीला ओ. आर.एस.,लस्सी, ताक, लिंबू पाणी इत्यादी घरगुती शीतपेय द्यावे. अशा व्यक्तीला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा. कारण उष्माघात घातक ठरू शकतो.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *