- अमरावती/स्वाती इंगळे
विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित इंदिराबाई मेघे महीला महाविद्यालयातील विशाखा समितीचे वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय आभासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.लीना कांडलकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावतीच्या डॉ.एडवोकेट नमिता अवस्थी , दिशा संस्थेच्या संचालिका एड. ज्योती खांडपासोळे उपस्थित होते. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि विचारपिठावरील प्रतिमाचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने गाणे कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी डॉ.एड. नमिता अवस्थी यांनी स्री-पुरुष समानता या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले.डॉ. अवस्थी यांनी स्त्रियांचे अधिकार आणि स्त्रियांना सक्षम करण्याच्या दृष्टीने घ्यावयाची प्रभावी भूमिका मांडली. दिशा च्या संचालिका एडवोकेट ज्योती खांडपासोळे यांनी “जेंडर अवरेनेस” या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले.स्वअनुभव कथन करीत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे आव्हान केले.
प्रास्ताविक डॉ. वामन जवंजाळ,पाहुण्यांचा परिचय प्रा. वंदना गावंडे तर आभारप्रदर्शन डॉ.मंदाकिनी मेश्राम यांनी केले.आभासी कार्यशाळेत सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.