आदिवासींच्या शिमग्यात “आधार”चा सहभाग

* “ओली महिमा” सणाला जीवनापयोगी वस्तूंचे वाटप.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    अमरावती : शिमगा म्हटलं की लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत रंगोत्सवाची उधळण.. होळी हा सण केवळ रंगाचेच नव्हे तर प्रेम, करुणा आणि बंधुत्वाचे प्रतिक आहे. विशेष तर जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगेत वास्तव्यात असणारे आदिवासी बांधव “दीपोत्सव” सणापेक्षा ही अधिक महत्व “होळी” सणाला देतात. सातपुड्यातील काही आदिवासी पाड्यात ५ दिवसाचा होळी सन उत्सवात साजरा केला जातो. खास करून आदिवासी बोली भाषेत होळी सणाला “ओली महिमा” असे हि म्हणतात. अशातच आधार फाउंडेशन या सामाजिक संघटनांचे दानशूर पदाधिकारी-कार्यकर्ते दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा होळी सणाच्या पूर्वीच १३ मार्चला आदिवासींच्या शिमग्यात सहभागी होत पाड्यावरील गोरगरीब गरजु, पात्र आदिवासी बांधवांना अन्न-धान्य, भाजीपाला, मुलांना पोषक आहार, आदिवासी महिला-पुरुष व बच्चे कंपनींना कपडे, बिस्किटे, खेळणे, खाद्यपदार्थ व जीवनापयोगी वस्तूंचे वाटप प्रदीप बाजड यांच्यामार्फत दर महिन्याला सातपुड्यातील वेगवेगळ्या गावांना केले जाते. आदिवासी अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी आधार फाउंडेशन या सामाजिक संघटनेन मदतीचा हात पुढ करीत आदिवासींच्या शिमग्यात “आधार”ने सहभाग घेत लहान-मोठ्या, बाळगोपालांसह सर्वांच्या चेहऱ्यावरचे हास्य फुलविले.

    कोरोना काळात संपूर्ण देशाची परिस्थिती ढासळली, त्यातच त्यात सातपुड्यातील आदिवासींची परिस्थिती अजूनच नाजूक आणि त्यात आदिवासींचा सण होळी अगदी एक-दोन दिवसांवर आला. “ओली महिमा” हा आदिवासींचा सण अतिशय चांगल्या प्रकारे साजरा व्हावा याहेतूने आधार फाउंडेशनच्या पुढाकारातून अमरावतीच्या दानशुरांनी एक हात मदतीचा देत कु.तन्वी अनंतराव बाजड हिने आपल्या पहिल्या पगारातून मेळघाटातील गरजवंत आदिवासी पुरुषांकरिता ५० धोतर व महिलांकरिता ५० लुगळे आधार फाऊंडेशन ला वाटपा करीता दिले, त्याचबरोबर संजयजी राऊत यांनी त्यांच्या कु. ‘शुभश्री’च्या वाढदिवसानिमित्त चाँकलेट व बिस्कीट आणी कपकेक वाटपा करीता दिले. तसेच प्रा.दिलीपजी राठोड यांनी मेळघाटातील गरीब आदिवासी मुलांकरीता पारले बिस्कीटचे बाँक्स उपलब्ध करून दिले. अमरावती शहरातील नारायण नगर येथील रहिवाशी गाडबेल साहेब यांनी मेळघाटातील गरजवंत आदिवासी बंधु करीता आधार फाऊंडेशनला १३ मार्चच्या दौऱ्यात वाटपाकरिता धोतर, दुप्पटे, बंगाली शर्टस व पैजामे उपलब्ध करून दिले. हे सर्व साहित्य मेळघाटातील अतिदुर्गम भागात असलेले गंगाधरी व चौरामल या गावात वाटप करण्यात आले. या समाजसेवी कार्यात दिपक खडेकार, कर्णल एल.डब्ल्यु.गाले, प्रविण गजरे, प्रा.रश्मी गजरे, अरविंद दादा विंचूरकर, प्रा.अनंतराव बाजड, सौ. सविता बाजड, संजयजी राऊत, मनिष हिरोडे, किशोर पन्नासे व प्रदीप बाजड, सौ. वैशाली बाजड यांनी सहभाग घेतला होता.