• Tue. Jun 6th, 2023

अरुण विघ्ने यांना केतन पिंपळापुरे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर    अमरावती : जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूर यांच्या वतीने दिल्या जाणारा केतन पिंपळापुरे स्मृती राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य पुरस्कार अरुण हरिभाऊ विघ्ने यांच्या ‘ मी उजेडाच्या दिशेने निघालो ‘ या बहुचर्चीत कवितासंग्रहाला नुकताच जाहीर झाल्याचे जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष डाँ. दीपककुमार खोब्रागडे व डाँ.गोविंदराव कांबळे,डाँ.रविंद्र तिरपुडे, सुजीत मुरमाडे यांनी एका निवडपत्राद्वारे कळविले आहे.

    अरुण विघ्ने यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशीत झालेले आहेत. त्यांनी आतापर्यंत 70 विविध पुस्तकांवर समीक्षा लिहील्या आहेत. हा पुरस्कार त्यांना दि.27/3/2022 रोजी दीक्षाभूमी नागपूर येथील आँडीटोरीयम सभागृहात होणा-या भव्य साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्काराबाबत त्यांचे अनेक साहित्तिकांनी, चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *