• Fri. Jun 9th, 2023

अक्कलकोट येथील काव्यसंमेलनात अमरावतीकरांचा उत्स्फूर्त सहभाग

    अमरावती : दिनांक १९ व २० मार्च २०२२ रोजी अक्कलकोट येथे दोन दिवसीय काव्यसंमेलन पार पडले.

    काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने स्वामीभक्त बाळासाहेब इंगळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १व्या काव्यमहोत्सवाचे व पुरस्कार वितरण सोहळ्याचेआयोजन करण्यात आले.त्यामध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या १२० कवी व ५० गझलकारांनी आपल्या दर्जेदार रचना सादर केल्या.काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राजाध्यक्ष श्री. आनंदजी घोडके, उपाध्यक्ष श्री. पी.नंदकिशोरदादा, सचिव श्री. कालिदासजी चवडेकर, कोषाध्यक्ष श्री. कृष्णाजी शिंदे, सहसचिव श्री. दिपकदादा सपकाळ यांनी कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले. विभागीय अध्यक्ष श्री. विजय बिंदोड (विभाग अमरावती), विभागीय उपाध्यक्ष श्री. खुशाल गुल्हाने विभाग अमरावती) यांची विशेष उपस्थिती लाभली.पारितोषिक वितरणामध्ये अमरावती येथील विशाल मोहोड यांच्या कुचंबना या कथासंग्रहाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला. तसेच यावेळी चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले .त्यामध्ये अमरावती येथील श्री.पी. नंदकिशोर संपादित माह्या विदर्भ भुमित या वऱ्हाडी प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

    याप्रसंगी अमरावती काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा भांदर्गे व संपूर्ण अमरावती टीमला उत्कृष्ट संयोजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यदिन स्पर्धेमध्ये उत्तेजनपर क्रमांकासाठी श्री.खुशाल गुल्हाने व सौ.कुमुद कोरडे यांना गौरवण्यात आले तसेच गझलकार रंजना कराळे यांनाही सन्मानित करण्यात आले. तसेच माळोकार भगिनी शैला चेडे, वंदना विंचूरकर, वर्षा भांदर्गे तर्फे ्यांच्या मातोश्री स्व. सरस्वतीबाई विष्णुपंत माळोकार यांच्या स्मृती प्रित्यर्थ गझलगूरू श्री.विजय जोशी डोंबिवली यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.तसेच विभागीय अध्यक्षा (नागपूर विभाग) सौ. कविता कठाने यांना सीमा भांदर्गे यांचे वडील स्व. श्रीरामपंत रघुनाथपंत बैतुले स्मृती प्रित्यर्थ सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व कविवर्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.यामध्ये श्री. विजय बिंदोड, श्री. खुशाल गुल्हाने, सौ.वर्षा भांदर्गे, श्री. प्रमोद भागवत, सौ.शैला चेडे, श्री. राजेश चौरपगार, सौ.सिमा भांदर्गे, सौ. वंदना विंचुरकर,सौ.अंजली वारकरी, सौ.कुमुद कोरडे, श्री.शाम चौकडे, डॉ.कैलास कापडे, विशाल मोहोड, प्रविण चांदोरे,यश इंगळे, बच्चूभाऊ गावंडे इत्यादी कवी कवयित्रींचा सहभाग होता.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *