अंधश्रद्धा..!

नवस करू देवाला

साकडं घालू देवाला
पोर दे देवा पोराला
काय म्हणावं अंधश्रध्येला।।1।।
घरात पैका टिकना
पैक्याला पैका लागणा
कापा ऐका बोकडाला
काय म्हणावा अंधश्रध्येला।।2।।
जमिनीत गुपित धन
भोंदूबाबा सांगे ऐके जण
बळी देऊ लहान बाळाला
काय म्हणावं अंधश्रध्येला।।3।।
भूतान धरलं ,भानामती
करणी केली हो घराला
नोकरी नाही हो पोराला
काय म्हणावं अंधश्रध्येला।।4।।
नवऱ्याला दारूचं व्यसन
आधी होत सगळं आनंदानं
फेकलं लिंबू संसाराला
काय म्हणावं अंधश्रध्येला।।5।।
भोंदूनंचा बाजार भरला
कमी नाही ताईत गंडयाला
बोकडाचा बळी यज्ञाला
काय म्हणावं अंधश्रध्येला।।6।।
सौ. वृंदा पंकज गंभीर(दत्तकन्या)
अहमदनगर
फोन-7498742443