• Mon. Sep 25th, 2023

अंकुरावा आत्मविश्वास दुःखमुक्तीचा

काळाचे नवे आकलन
व्हावे एकदा दृष्टीला
अनादी अनंत धावणे पाहता यावे
आपल्या स्वप्नांची रिती ओंजळ
कधी भरु देत नाही तृष्णा
मन स्वतःच्या तुष्टीकरणाचे हेतूप्रत्यय
गोळा करून बांधत राहते मनोमन
मनोरे भौतिकाचे
फिरत राहते दाव्यास बांधलेल्या
सश्यासारखे असाह्य
ढूंडाळत राहते सुख
रानोरान भटकत कस्तुरीमृगासारखे
ही तृष्णा
जिचे मूळ स्वतःच्याच आत
खोदत जावे लागते
खोलवर करावी लागते नांगरनी
माती करावी लागती भूसभूसीत हृदयाची
या तप्त भूमीवर
एकदा तरी पडावा चिंतनाचा पाऊस
अंकुरावा आत्मविश्वास दुःखमुक्तीचा
ही मनाची मशागत
करावी लागते जीव लावून
जिला टाळत आलो आयुष्यभर
ते अशक्यच आहे असे वाटते
आपले अधिष्ठान डगमगते
तन बेफाम वाढलेल शेतात मावत नाही
तणावच टाकतो घेरुन
आपला गड राखून ठेवण्यासाठी
आपल्या स्मृतीचे नेक पहारेदार हवे
प्रज्ञेचा हवा लढावू सेनापती
शीलाची तटबंदीही हवी
स्वयंतेजाने आभामय व्हावी चरिया
आपल्या उठवळ नादानतेला
जाणता यावे सम्यक दृष्टीने
पुन्हा एकदा रसातळाला जाण्याआधी
देहातच लपले आहे मरण वार्धक्य
दुःखाची परंपरा
ज्याचा बोध होत नाही
चला बदलवीत जावू मनोरचना
या वस्ती वस्तीत उजेड पेरु
च्याचा आदी मध्य अंत कल्याणकारी आहे.
 – सुभाष गडलिंग

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,