Header Ads Widget

रमाई माउली

  माझी रमाई माउली
  ही कोटी कोटीची सावली
  मनामनात कशी भावली
  जशी करुणा अतःरी द्रवली
  बालवयात मनी वसली
  करुनेची ही निष्ठी
  बाळांतणीले दिली भाजी
  भाकरी नी भात
  तीथेच लावली ज्योत
  उपासावर ही मात
  भीम क्रांतीकारी बाई
  रमा त्यांची साथ
  दोघांच्या संगतीने होता
  सुखदुःखात गा साथ
  लढे क्रांतीचे ते लढले
  या युंगधरी भिमाने
  पैशाची काटकसर
  अशी केली गा रमाने
  भासू दिले नाही
  घरातली ही गरीबी
  दावी मनाची श्रीमंती
  उपाशी ही तरीबी
  बाळ गमाविले सारे
  ही घोर गरीबी होती
  भिमबा रडे ढसढसा
  काय परिस्थीती होती
  महानायक भारताचा
  असा जोपासला तो तीने
  हर कार्यात साथ
  कशी निभवीली रमाने
  जयंती आज रमाई माउलिची
  करुया आनंदाने हो साजरी
  लावू ज्योत रमाईची
  धरू समता अंतःरी गोजीरी
  माझेही वंदन या माउलिला
  बापमाय या रमाभिम जोडीला
  अवघ जग करते वंदन
  या अनमोल कार्याला
  या रमा भिमा मायबापालाss
  -प्रतिभा प्रधान
  भोवते ले आउट,अमरावती
  मोबा,7057605968

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या