तिर्थी अन्नछत्रे । करुनी स्थापन।
तीर्थयात्री मन। आनंदित॥१॥
पंगुंना औषधी। मुक्यांना अभय।
वाटू नये भय । जीवनात ॥२॥
गरीब जनांना । भांडे वितरण।
स्वतःचे जेवण। खापरात॥३॥
दु :खी जनांसाठी । देह झिजवून।
संदेश महान। कीर्तनात ॥४॥
जरीचे कापड ।अपंगांना देई।
अंगभर घेई। वस्त्र चिंधी॥५॥
तत्त्व पुरोगामी। कीर्तनात वाणी।
विचार सरणी । क्रांतिकारी॥६॥
कर्मयोगी संत । गाडगे बाबांना।
करितो वंदना । कोटी कोटी॥७॥
-प्रा अरुण बाबारावजी बुंदेले,
रुक्मिणीनगर , अमरावती .
भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९.
0 टिप्पण्या