मुंबई : बॉलिवूडची डान्सिंग दिवा, धकधक गर्ल माधुरी दीक्षित गेला बराच काळ मोठय़ा पडद्यापासून दूर आहे. तिचा शेवटचा चित्रपट २0१९ मध्ये आला होता. कलंक नावाचा हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी बराच चर्चेत होता. पण, तो प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर दणकून आदळला.
या चित्रपटानंतर माधुरी मोठय़ा पडद्यावर दिसली नव्हती. लॉकडाऊनच्या काळात तिने तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत काही व्हिडीओ टाकले. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याचीच पुढची पायरी म्हणून की काय, माधुरी आता वेबसीरीजकडे वळली आहे.
नेटफ्लिक्सवरील आगामी द फेम गेम या वेबसीरीजमधून ती झळकणार आहे. या वेबसीरीजमध्ये ती अनामिका या भूमिकेत झळकेल. या वेबसीरीजची निर्मिती करण जोहरच्या धर्माटिक एन्टरटेन्मेंटने केली आहे. तर याची संहिता श्री राव यांची आहे. या वेबसीरीजमध्ये माधुरीसोबत संजय कपूर, मानव कौल, सुहासिनी मुळ्ये, लक्षवीर सरन, मुस्कान जाफरी, गगन अरोरा, निशा मेहता हे कलाकार दिसणार आहेत. ही सीरीज बिजॉय नाम्बियार आणि करिश्मा कोहली यांनी दिग्दर्शित केली असून ती नेटफ्लिक्सवर २५ फेब्रुवारीपासून प्रदर्शित होत आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या