मुंबई : छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. ही मालिका जवळपास १४ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. ही मालिका टीआरपीमध्ये देखील टॉपला असल्याचे पाहायला मिळते. या मालिकेत काम करणारे अनेक कलाकार बदलले आहेत. आता सोशल मीडियावर जेठालाला म्हणजेच दिलीप जोशी मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
मालिके संबंधीत एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये निर्माते असित मोदी यांनी जेठालालच्या भूमिकेत सोशल मीडिया कंटेन्ट क्रिएटर सौरभ घाडगेला घेतल्याचे म्हटले आहे. पोस्टमध्ये सौरभ जेठालालच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले आहे. त्यासोबतच मालिकेचे पोस्टर आणि बाजूला सौरभचा फोटो लावण्यात आला आहे. या फोटोवर लिहिण्यात आले आहे की जेठा च्या जागी सौरभला घेण्याचा विचार तारक मेहताचे निर्माते करत आहेत.
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका छोट्या पडद्यावरील सर्वाधिक काळ चाललेली मालिका आहे. या मालिकेत दिलीप जोशी यांच्यासोबतच अमित भट्ट, शैलेश लोढा, मुनमुन दत्ता आणि इतर काही कलाकार दिसत आहेत.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या