- * स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व .रामकृष्ण खेरडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनाचे आयोजन
अमरावती:" जनसेवा व देशसेवा"स्वहितापेक्षाही श्रेष्ठ मानणारे, स्वातंत्र्य संग्रामात भाग घेऊन देशसेवा करणारे ,भारतीय स्वातंत्र्यासाठी "चले-जाव" आंदोलनात १९४२ मध्ये उडी घेऊन तुरुंगवास भोगणारे स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व .रामकृष्ण खेरडे एक देशप्रेमी स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे कर्तृत्व, त्याग व सेवा यातून त्यांच्या आदर्श जीवनाचा सुगंध दरवळत होता.स्वातंत्र्यसैनिकांच्या विविध संघटनेचे नेतृत्वही त्यांनी केले होते. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून समाजाला भ्रष्टाचार मुक्त करणाऱ्या सज्जन व सदविचारी व्यक्तिमत्वाला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन." असे विचार प्रमुख वक्ते प्रा. अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.
ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व.रामकृष्ण खेरडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त दि.९ फेब्रुवारी २०२२ ला संपन्न झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून आदरांजली अर्पण करीत होते.गणेश कॉलनी, अमरावती येथील प्रा. डॉ.सुनंदाताई खेरडे यांच्या निवासस्थानी कोरोना नियमांचे पालन करून उपेक्षित समाज महासंघ, अमरावती व कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले प्रतिष्ठान,अमरावती तर्फे आयोजित स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व.रामकृष्ण खेरडे यांच्या द्वितीय स्मृतिदिन कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यशोधक प्रा. श्रीकृष्ण बनसोड, प्रमुख वक्ते प्रा. अरुण बा. बुंदेले (समाजप्रबोधनकर्ते), प्रमुख अतिथी समाजभूषण सौ.शालिनीताई मांडवधरे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारप्राप्त प्रा. डॉ. सुनंदाताई खेरडे होत्या .युवा नेते श्री सुधीर कुमार घुमटकर,श्री राजकुमार खैरे, डाँ.सौ.निलिमा उमप,सौ.हिमश्री उमप,श्री गोविंद फसाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम अध्यक्ष प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथींच्या हस्ते स्वातंत्र्यसेनानी स्व. रामकृष्ण खेरडे यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी"स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. रामकृष्ण खेरडे हे जाज्ज्वल्य देशाभिमाननी होते.आदर्श प्रशासकीय अधिकारी, कुटुंबवत्सल पिता होते .स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान हे सदैव सर्वांना प्रेरणा देणारे आहे "असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी प्रा.अरुण बुंदेले यांनी स्व .रामकृष्ण खेरडे यांच्या व्यक्तिमत्त्वावर स्वरचित अभंगाचे गायन केले.समाजभूषण सौ. शालिनीताई मांडवधरे यांनी काव्य गीताचे गायन केले. कार्यक्रमाचे संचालन युवानेते श्री सुधीरकुमार घुमटकर व आभार प्रदर्शन डाँ.सौ.निलिमा उमप यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली.
0 टिप्पण्या